महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या श्रेयांका पाटीलने ( Shreyanka Patil) आज Asian Cricket Council Women's Emerging Teams Cup स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. भारत अ विरुद्ध हाँग काँग यांच्यातल्या सामन्यात श्रेयांकने ३ षटकांत २ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. तिने एक षटक निर्धाव टाकले अन् हाँग काँगचा संपूर्ण संघ १४ षटकांत ३४ धावांत गुंडाळला. बंगळुरूच्या श्रेयांकाने WPL मध्येही आपली अष्टपैलू धमक दाखवली होती.
भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मन्नत कश्यपने दुसऱ्याच षटकात हाँग काँगच्या नताशा माईल्सची विकेट्स घेतली. त्यानंतर श्रेयांकाने विकेट्सची रांग लावली. मन्नतने २ धावा देत २ विकेट्स घेतल्या अन् पार्शवी चोप्रानेही १२ धावांत २ विकेट्स घेत हाँग काँगला धक्के दिले. तितास संधूने एक विकेट घेतली. पण, श्रेयांकाने ही मॅच गाजवली. तिने ३-१-२-५ अशी अप्रतीन गोलंदाजी केली.
![]()
भारतीय महिला संघाने ९ विकेट्स राखून ही मॅच जिंकली. भारताने ५.२ षटकांत १ बाद ३८ धावा करून बाजी मारली.