Join us

इंग्लंडला सुरुवातीला धक्के; विंडीजविरुद्ध चहापानापर्यंत ४ बाद १३१ धावा

तिसरी कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 06:48 IST

Open in App

मॅन्चेस्टर : वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी यजमान इंग्लंडची पुन्हा अडखळत सुरुवात झाली. चहापानापर्यंत त्यांनी ५३ षटकात १३१ धावात ४ गडी गमावले. ओली पोप (२४) आणि जोस बटलर (२) खेळपट्टीवर होते.त्याआधी डॉम सिब्ले केमार रोच याच्या पहिल्याच चेंडूवर पायचित तसेच कर्णधार ज्यो रुट १७ धावांवर दुर्दैवी धावबाद होताच उपहारापर्यंत इंग्लंडची २ बाद ६६ अशी पडझड झाली होती. रोरी बर्न्स याने सर्वाधिक ५७ धावा काढून सावरले. विंडीजच्या वेगवान माºयाने यजमान फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही.

४१ व्या षटकात केमार रोचने इंग्लंडला जबर धक्का दिला. मागच्या लढतीचा हिरो बेन स्टोक्स(२०) याचा त्याने त्रिफळा उडवला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडने जॅक क्राऊले ऐवजी जोफ्रा आर्चर आणि सॅम कुरेनऐवजी जेम्स अ‍ॅन्डरसन याला संघात स्थान दिले. विंडीजने वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफच्या जागी फिरकीपटू रहकीम कॉर्नवाल याला संघात घेतले.(वृत्तसंस्था)

इंग्लंड (पहिला डाव) : रॉरी बर्न्स ५७, डॉम सिब्ले पायचित गो. केमार रोच ००, ज्यो रुट धावबाद १७, बेस स्टोक्स त्रि. गो. रोच २०, एकूण : ५३ षटकात ४ बाद १३१. गोलंदाजी: केमार रोच २/२८,रोस्टन चेस १/१.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज