Join us  

धक्कादायक... भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तरने घेतले होते पाच इंजेक्शन्स

हा सामना पाकिस्तानने का गमावला, याचे उत्तरही अख्तरने दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 6:04 PM

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे युद्धचं. या दोन देशांतील जर विश्वचषकाचा सामना असेल तर तो कोण विसरू शकेल. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तर सर्वांनाच तोंडपाठ असेल. या सामन्यात माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने 98 धावांची खेळी साकारली होती. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाच इंजेक्शन्स घेतल्याचे समोर आले आहे. ही गोष्ट सांगितली आहे ती दस्तुरखुद्द अख्तरनेच.

हा सामना पाकिस्तानने का गमावला, याचे उत्तरही अख्तरने दिले आहे. तो म्हणाला की, " या सामन्यात खेळण्यासाठी मी फिट नव्हतो. माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याबरोबर या सामन्यात पाकिस्तानकडून चांगले नेतृत्व पाहायला मिळाले नाही. या दोन गोष्टींमुळे आमचा पराभव झाला."

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अख्तरला दुखापत झाली होती. त्याचा डावा गुडघा दुखावला होता. तो सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. याबाबत अख्तरने सांगितले की, " सामन्यापूर्वीच्या रात्री माझा डावा गुडघा दुखत होता. पण मला भारताविरुद्धच्या सामन्यात खेळायचे होते. त्यावेळी मी डाव्या गुडघ्यामध्ये पाच इंजेक्शन्स घेतले होते. त्यावेळी माझा गुडघा सुन्न पडला होता. त्यामुळे सामन्यात मला शंभर टक्के कामगिरी करता आली नाही."

टॅग्स :शोएब अख्तरसचिन तेंडुलकरभारतपाकिस्तान