Join us

धक्कादायक! विश्वचषकात अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होते निवड समिती सदस्य; माजी क्रिकेटपटूंचा खुलासा

या निवड समितीला त्यांनी मिकी माऊस असे देखील म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:26 IST

Open in App

मुंबई : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात निवड समितीमधील सदस्य हे कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीचे चहाचे कप उचलत होते, असा धक्कादायक खुलासा भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी केला आहे. या निवड समितीला त्यांनी मिकी माऊस असे देखील म्हटले आहे.

सध्याच्या घडीला निवड समितीमध्ये एकही अनुभवी क्रिकेटपटू नाही. संपूर्ण निवड समितीमधील सदस्यांनी 15 कसोटी सामनेही खेळलेले नसतील. त्यामुळे या निवड समितीवर विराटचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्माच्या चहाचे कपदेखील ते विश्वचषकात उचलत असल्याचा खुलासा भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केला आहे.

इंजिनिअर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, " विश्वचषक पाहायला मी गेलो होतो. तिथे काही व्यक्ती अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होते. या व्यक्ती कोण होत्या हे मला माहिती नव्हते. पण कालांतराने या व्यक्ती भारताच्या राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्य असल्याचे समजले."

ते पुढे म्हणाले की, " हा प्रकार निंदनीय असाच होता. पण जर असे प्रकार थांबवायचे असतील तर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरसारखे खेळाडू निवड समितीमध्ये असायला हवे."

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली