Join us  

धक्कादायक; मुंबईकर क्रिकेटपटूची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

लॉकडाऊनमुळे क्रीडा स्पर्धाच होत नसल्यानं ओढावलं आर्थिक संकट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 1:40 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे मागील सहा महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारी आली.. अनेकांना कर्मभूमी सोडून जन्मभूमीत जावं लागलं... त्यात क्रीडा स्पर्धा होत नसल्यानं अनेक खेळाडूंवरही आर्थिक संकट ओढावलं आहे. याच नैराश्यातून मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या क्रिकेटपटू करण तिवारीनं आत्महत्या केली आहे. 27 वर्षीय करणने गळफास घेऊन आत्महत्या केली.

करण स्थानिक पातळीवरील क्रिकेट खेळत होता. मुंबईच्या रणजी संघासाठी तो नेट्समध्ये गोलंदाजी करायचा.  सोमवारी रात्री गोरेगाव (पू) येथील गोकुळनगर परिसरात  राहत्या घरी करणने गळफास घेतला, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने दिली. कुरार पोलीस ठाण्यात करणच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली असून चौकशी सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितलं.

करण आपल्या आई आणि भावासोबत राहत होता. लॉकडाऊनमुळे IPL किंवा तत्सम मोठ्या सामन्यांमध्ये खेळायची संधी हुकल्याने करणने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.  त्यानं शेवटचा फोन राजस्थानमध्ये असलेल्या  मित्राला केला होता. मी मानसिक तणावात असून मी आत्महत्या करत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं होतं, असे वृत्त एका वाहिनीनं दिलं.

करणचा फोन झाल्यानंतर संबंधित मित्राने करणच्या बहिणीला फोन करून याची माहिती दिली. करणची बहिण देखील राजस्थानमध्ये राहते. मित्राच्या फोननंतर करणच्या बहिणीने मुंबईत आईला फोन करून सांगितले. पण तोपर्यंत फार उशिर झाला होता. रु 

अन्य महत्त्वाचे बातम्या

अरे देवा... IPL 2020 सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह! 

खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल

IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल 

बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR 

अनुष्काने केली प्रश्नांची सरबत्ती; रागीट विराट पत्नीसमोर हरला; Video Viral

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई