Join us  

एकीकडे शोएबने पोस्ट केला लग्नाचा फोटो, तर दुसरीकडे सानियाने टाकली इन्स्टा स्टोरी!

सानिया मिर्झाच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नक्की काय... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 3:32 PM

Open in App

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक ( Shoaib Malik) आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) या दोघांचे नाते आलबेल नसल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. याच दरम्यान आज शोएब मलिकने नवा संसार थाटल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले. सानियाशी असलेल्या तणावाच्या नात्यांच्या चर्चेदरम्यान, अचानक शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद ( Sana Javed) हिच्यासोबत लग्नाचे फोटो पोस्ट केले. सानिया मिर्झासाठी हा धक्का आहे की तिला याबाबतची आधीपासूनच कल्पना होती, यावर अनेक तर्कवितर्क सोशल मीडियावर लढवले जात आहेत. सानियाने दोन दिवसांपूर्वीच लग्न आणि घटस्फोट दोनही गोष्टी खूप कठीण असतात, अशा आशयाची स्टोरी पोस्ट केली होती. तसेच, तिने शोएबसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले होते. त्यातच एकीकडे शोएबने लग्नाचा फोटो पोस्ट केला असताना, दुसरीकडे सानियाने देखील इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली.

शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला. सानियाने शोएबपासून तलाख घेतलेला नाही तर त्यांचा 'खुला' झाला आहे, असे सानियाच्या वडिलांनी सांगितले. लग्नाचे नाते जेव्हा पुरूषाकडून संपवले जाते तेव्हा त्यास तलाख म्हणतात आणि स्त्रीने लग्नाचे नाते संपवले तर त्याला खुला म्हणतात, अशी माहिती सांगितली जात आहे. त्यानुसार सानियाने खुला केला असल्याचे सांगितले. त्यामुळे शोएबने लग्नाची घोषणा केल्यावरही सानियाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कोणतीही वैयक्तिक गोष्ट पोस्ट केली नाही. तिने केवळ तिच्या आगामी टेनिस संबंधित कार्यक्रमाचा एक फोटो पोस्ट केला आणि आसपास सुरू असलेल्या इतर सर्व गोष्टींबाबत मौन बाळगले. पाहा तिची स्टोरी-

दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं होतं. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असं आहे. पण, कोरोना काळानंतर दोघांमधील नात्यात दुरावा आला. मग घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आणि आज या चर्चांवर अखेर पडदा पडला.

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकघटस्फोटपाकिस्तानटेनिस