Join us

क्रिकेटच्या भाषेत मी चाळिशीतला म्हातारा; पण माझा फिटनेस २५ वर्षांच्या तरुणासारखा

Shoaib Malik: क्रिकेटच्या भाषेत मी चाळिशीतला म्हातारा जरी असलो तरी माझा फिटनेस २५ वर्षाच्या तरुणालाही लाजवेल, असे शोएबने मलिकने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 06:36 IST

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकनेपाकिस्तानी संघातून पुन्हा एकदा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानकडून खेळून चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता असल्याचे त्याने म्हटले. खरं तर ४० वर्षीय शोएबने आपला फिटनेस अद्याप चांगला असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय संघातील पुनरागमनावर भाष्य केले. क्रिकेटच्या भाषेत मी चाळिशीतला म्हातारा जरी असलो तरी माझा फिटनेस २५ वर्षाच्या तरुणालाही लाजवेल, असे शोएबने मलिकने म्हटले आहे.

सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्सकडून खेळत आहे.  यादरम्यान सिल्हेट आंतरराष्ट्रीय मैदानावर पत्रकारांशी बोलताना त्याने सांगितले की, ‘मी क्रिकेट खेळत राहीन आणि म्हणूनच मी सध्या निवृत्तीचा विचारही करत नाही आहे. मला अजून धावांची भूक आहे. खरे सांगायचे तर मी संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे; पण तुम्ही माझ्या फिटनेसची तुलना कोणत्याही २५ वर्षीय खेळाडूशी करू शकता. तंदुरुस्ती राखण्याची मला सतत प्रेरणा मिळत असल्याने मी अजूनही बाहेर जाऊन मोठी धावसंख्या उभारू शकतो. त्यामुळे मी यापुढेही क्रिकेट खेळत राहीन.’

तसेच शोएब मलिकने हेदेखील सांगितले की, ‘तो शारीरिक तंदुरुस्ती चाचणीत कोणत्याही युवा खेळाडूला खुले आव्हान देऊ शकतो. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून सोबतच निवृत्ती घेईन. पण, आताच्या घडीला मी फक्त याचा आनंद घेत आहे. जर मला संधी मिळाली तर नक्कीच पाकिस्तानी संघातून खेळेन. मी या आधीच कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. मात्र, टी-२० क्रिकेटसाठी अद्याप उपलब्ध आहे आणि जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा शानदार खेळी करण्याचा प्रयत्न करेन.’

टॅग्स :शोएब मलिकपाकिस्तानआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App