Join us

शोएब स्वतःला 'क्रिकेटचा डॉन' म्हणाला, नेटकऱ्यांनी 'बाप' दाखवला!

आपल्या काही बाउन्सर आणि यॉर्कर चेंडूंनी फलंदाजांची कशी दाणादाण उडवली होती, याचे फोटो शोएब अख्तरने एका ट्विटमधून शेअर केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 14:08 IST

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरची नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलीच धुलाई केलीय. अर्थात, त्याला कारणीभूत स्वतः शोएबच ठरला. त्यानं एका ट्विटमध्ये स्वतःला 'डॉन ऑफ क्रिकेट' म्हणवून घेतलं आणि मग नेटिझन्सनी त्याला धुतलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला हाणलेल्या षटकाराचे व्हिडीओ पोस्ट करून ट्विपल्सनी त्याला 'बाप' दाखवला. 

आपल्या काही बाउन्सर आणि यॉर्कर चेंडूंनी फलंदाजांची कशी दाणादाण उडवली होती, याचे फोटो शोएब अख्तरने एका ट्विटमधून शेअर केले होते. या सगळ्यात कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, वगैरे भावनाही त्यानं व्यक्त केल्या होत्या. पण, त्याच्या ट्विटमधला 'डॉन ऑफ क्रिकेट' हा शब्द भारतीय क्रिकेटप्रेमींना खटकला. 

शोएब स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायचा प्रयत्न करत असल्याचं पाहून काही मंडळी कामाला लागली. २००३च्या वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरने केलेल्या शोएबच्या धुलाईचे व्हिडीओ त्यांनी शोधून काढले आणि 'बाप बाप होता है', या उक्तीची जाणीव शोएबला करून दिली. त्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांवर जणू 'सर्जिकल स्ट्राइक' करत सचिननं ७५ चेंडूत ९८ धावा तडकावल्या होत्या.  

दरम्यान, भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं गेल्या आठवड्यात शोएब अख्तरच्या गोलंदाजीचं कौतुक केलं होतं. शोएबला सामोरं जाताना मनात थोडी धाकधुक असायची, त्याचा कुठला चेंडू डोक्यावर आदळेल आणि कुठला शूजवर जाईल, याचा नेम नसायचा, असं वीरूनं म्हटलं होतं. त्यानंतर लगेचच शोएब शायनिंग मारायला गेला आणि तोंडावर आपटला. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरपाकिस्तानविरेंद्र सेहवाग