देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी करंडक स्पर्धेच्या नव्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट संघाविरुद्धच्या लढतीनं मुंबई क्रिकेट संघाने यंदाच्या मोहिमेची सुरुवात केली. पण या सामन्याआधीच मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला. पहिल्या सामन्यात मुंबईचा संघ शिवम दुबेशिवाय मैदानात उतरला. मंगळवारीच शिवम दुबे घरी परतला. पाठीच्या किरकोळ दुखापतीमुळे त्याने रणजी सामन्यातून माघार घेतल्याची माहित समोर आली आहे. तो मुंबईच्या संघातून आउट झाल्याची गोष्ट सूर्यकुमार यादवला टेन्शन वाढवणारी ठरणार का ? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भात सविस्तर
मुंबई संघापाठोपाठ टीम इंडियातूनही तो आउट होणार?
आशिया कप स्पर्धेत शिवम दुबे याने ऑलराउंडरच्या रुपात खास छाप सोडली होती. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने त्याचा उत्तमरित्या वापर करून घेतला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्याची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शिवम दुबेची भारतीय टी-२० संघात निवड झाली आहे. दुखापतीमुळे मुंबईच्या संघातून बाहेर पडल्यावर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. जर तसे घडलं तर सूर्यकुमार यादवसाठी आणि टीम इंडियासाठी हा चिंतेचा विषय ठरेल.
तोच धोका टाळण्यासाठी घेतलीये खबरदारी?
शिवम दुबेच्या दुखापतीसंदर्भात सविस्तर माहिती समोर आली नाही. पण त्याची दुखापत किरकोळ असून ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी जोखीम नको, याच उद्देशाने ऑलराउंडर खेळाडूला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यांपासून लांब ठेवण्यात आ्याचे बोलले जात आहे. २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिका झाल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी त्याचा मार्ग पुन्हा खुला होईल, असे योजना आखण्यात आल्याचे समजते.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक) रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर.