Join us  

शिवाजी चषक क्रिकेट : पीव्हीजी अभियांत्रिकी महाविद्यालय अजिंक्य

अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (सीओईपी) आयोजित शिवाजी चषक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संघाने विजेतेपद पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 1:12 AM

Open in App

पुणे - अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (सीओईपी) आयोजित शिवाजी चषक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संघाने विजेतेपद पटकावले. बुधवारी झालेल्या अंतिम लढतीत या संघाने सीओईपीचा ६६ धावांनी धुव्वा उडविला.व्हिजन अकादमीच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत फलंदाजी तसेच गोलंदाजीच्या क्षेत्रात पुणे विद्यार्थी गृहाच्या संघाने वर्चस्व गाजविले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुणे विद्यार्थी गृह संघाने ६ बाद १४६ धावा केल्या. यात सूरज गुप्ताने सर्वाधिक नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. शुभंकर हर्डीकर (४५) आणि अनिकेत वाळिंबे (२८) यांनी त्याला मोलाची साथ दिली. विजयासाठी १४७ धाावांचे आव्हान सीओईपी संघाला अजिबातही पेलवले नाही . हा संघ १९.२ षटकांत ८० धावांवर बाद झाला. वरूण पट्याल याची ४६ धावांची झुंज एकाकी ठरली. विजेत्या संघातर्फे अद्वैत कुलकर्णीने ३ तर किरण बन्सोडेने २ गडी बाद केले. नाबाद ४९ धावा आणि २० धावांत १ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा सूरज गुप्ता सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.संक्षिप्त धावफलकपुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय : २० षटकांत ६ बाद १४६ (सूरज गुप्ता नाबाद ४९, शुभंकर हर्डीकर ४५, अनिकेत वाळिंबे २८, गोपीनाथ जाधव २/३९, वेदांत आर. १/२५, व्यंकटेश शेवाळे १/२८, आशिष सपकाळ १/३०) विवि पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय : १९.२ षटकांत सर्व बाद ८० (अद्वैत कुलकर्णी ३/४, किरण बन्सोडे २/६, शुभंकर हर्डीकर २/१८, निखिल कारळे १/११, सूरज गुप्ता १/२०, नायकेश कोळपे १/२१). सामनावीर : सूरज गुप्ता.इतर पारितोषिके : सर्वोत्तम फलंदाज : वरूण पट्याल (सीओईपी), सर्वोत्तम गोलंदाज : व्यंकटेश शेवाळे (सीओईपी), मालिकावीर : शुभंकर हर्डीकर (पुणे विद्यार्थीगृह अभियांत्रिकी महाविद्यालय).

टॅग्स :पुणे