Join us  

स्मृती मानधनाला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 4:30 PM

Open in App

मुंबई : भारताची शान असलेली आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाला महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2017-18 या वर्षामध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो. स्मृतीने गेल्या वर्षात दमदार कामगिरी करत या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.

क्रीडामंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०१७-१८) ची घोषणा केली. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन पुरस्कार हा मलखांब क्षेत्रात प्रशिक्षण देणारे उदय देशपांडे यांना घोषित झाला आहे तर शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार साताऱ्याच्या प्रियंका मंगेश मोहिते (गिर्यारोहण) यांना घोषित झाला आहे. श्री. विनोद तावडे यांनी आज घोषित केलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये आर्चरी, ॲथलॅटिक्स, ट्रायथलॉन, वुशु, स्केटिंग, हॅण्डबॉल, जलतरण, कॅरम, जिम्नॅस्टीक, टेबल टेनिस, तलवार बाजी, बॅडमिंटन, बॉक्सींग, रोईंग, शुटींग, बिलियर्डस ॲण्ड स्नूकर, पॉवर लिफ्टील, वेट लिफ्टींग, मलखांब, आट्यापाट्या, कबड्डी, खोखो, कुस्ती, बुध्दीबळ, लॉन टेनिस, हॉलीबॉल, सायकलींग, स्क्वॅश, क्रिकेट, हॉकी या विभागातील ५५ खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे २०१७-१८ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक/कार्यकर्ते या विभागात ७ पुरस्कारांचा तर एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यामध्ये ९ पुरस्कारांचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १५ जणांना घोषित करण्यात आला. येत्या रविवारी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

एकूण ८८ पुरस्कार यावेळी घोषीत करण्यात आले असून त्याची संपुर्ण य़ादी अशी-

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ( सन 2017-18)

श्री. उदय विश्वनाथ देशपांडे, मुंबई शहर

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकव जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (सन 2017-18)

सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार

श्री. अमेय शामसुंदर जोशी, औरंगाबाद,(जिम्नॅस्टिक्स) (थेट पुरस्कार)

श्री. सागर श्रीनिवास कुलकर्णी, औरंगाबाद,(जिम्नॅस्टिक्स) (थेट पुरस्कार)

श्री.गजानन मारुती पाटील, पुणे (ॲथलेटिक्स)

श्रीमती मृणालीनी वैभव औरंगाबादकर, पुणे, (बुध्दीबळ) (थेटपुरस्कार)

जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ( उत्कृष्ठ मार्गदर्शक )

श्री संजय बबन माने, मुंबई (कुस्ती )(थेट पुरस्कार)

डॉ. भूषण पोपटराव जाधव़,ठाणे,(तलवारबाजी) (थेट पुरस्कार)

श्री. उमेश रमेशराव कुलकर्णी,पुणे,(तायक्वोंदो) ) (थेट पुरस्कार)

श्री.बाळकृष्ण मलप्पा भंडारी,पुणे, (तायक्वोंदो) ) (थेट पुरस्कार)

श्री. स्वप्‍नील सुनिल धोपाडे,अमरावती,(बुध्दीबळ), (थेट पुरस्कार)

श्री.निखिल सुभाष कानेटकर, पुणे,(बॅडमिंटन), (थेट पुरस्कार)

श्री. सत्‍यप्रकाश माताशरन तिवारी,मुंबई उपनगर,(बॅडमिंटन),(थेट पुरस्कार)

श्रीमती दिपाली महेंद्र पाटील,पूणे (सायकलिंग)

जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ( उत्कृष्ठ मार्गदर्शक )

 

सांघिक क्रीडा प्रकार

श्री. पोपट महादेव पाटील, सांगली,(कबडडी) (थेट पुरस्कार)

श्री. राजेंद्र प्रल्हाद शेळके़ सातारा, (रोई्ंग ) (थेट पुरस्कार)

श्री. लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे, अमरावती, (वॉटरपोलो)

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( खेळाडू ) ( सन 2017-18)

आर्चरी

श्री. प्रविण रमेश जाधव , सातारा

श्रीमती भाग्यश्री नामदेव कोलते,पुणे

 

ॲथलेटिक्स

श्री. सिध्दांत उमानंद थिंगालाया, मुंबई उपनगर ( थेट पुरस्कार )

श्रीमती मोनिका मोतीराम आथरे, नाशिक ( थेट पुरस्कार )

श्री.कालिदास लक्ष्मण हिरवे,सातारा श्रीमती मनिषा दत्तात्रय साळुंखे़, सांगली

 

ट्रायथलॉन

श्री.अक्षय विजय कदम, सांगली –

 

वुशु 

श्री. शुभम बाजीराव जाधव,कोल्हापूर

श्रीमती श्रावणी सोपान कटके,पुणे

 

स्केटींग 

श्री. सौरभ सुशिल भावे, पुणे –

 

हॅण्डबॉल

श्री. महेश विजय उगीले, लातूर

श्रीमती समीक्षा दामोदर इटनकर, नागपूर

 

जलतरण

श्री.श्वेजल शैलेश मानकर,पुणे

श्रीमती युगा सुनिल बिरनाळे,पुणे

 

कॅरम

श्री.पंकज अशोक पवार,ठाणे

श्रीमती मैत्रेयी दत्तात्रय गोगटे,रत्नागिरी

 

जिम्नॅस्टिक्स

श्री सागर दशरथ सावंत, मुंबई उपनगर (आर्टिस्टक )

श्रीमती दिशा धनंजय निद्रे – मुंबई शहर (रिदॅमिक)

 

टेबल टेनिस

श्री सनिल शंकर शेट्टी- मुंबई उपनगर (थेट पुरस्कार) –

 

तलवारबाजी

श्री अक्षय मधुकर देशमुख, नाशिक

श्रीमती रोशनी अशोक मुर्तडक ,नाशिक

 

बॅडमिंटन

श्री अक्षय प्रभाकर राऊत ,बीड

श्रीमती नेहा पंडीत ,पुणे

 

बॉक्सिंग

श्रीमती भाग्यश्री शिवकुमार पुरोहित, मुंबई

 

रोईग

श्री.राजेंद्रचंद्र बहादुर सोनार,नाशिक

श्रीमती पुजा अभिमान जाधव, नाशिक

 

शुटींग

श्रीमती हर्षदा सदानंद निठवे ,औरंगाबाद

 

बिलीयर्डसअँण्ड स्नूकर

श्री. धृव अश्विन सित्वाला, मुंबईशहर (थेटपुरस्कार) –

श्री. सिध्दार्थशैलेशपारीख, मुंबईशहर, (थेटपुरस्कार) –

 

पॉवरलिफ्टींग

श्री मनोज मनोहर मोरे, मुंबई उपनगर

श्रीमती अपर्णा अनिल घाटे , मुंबई शहर

 

वेटलिफ्टींग 

श्रीमती दिक्षा प्रदिप गायकवाड ,अमरावती

 

बॉडीबिल्डींग

श्री.दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी,कोल्हापूर

 

मल्लखांब

श्री. सागर कैलास ओव्हळकर, मुंबई उपनगर

 

आटयापाटया

श्री. उन्मेश जीवन शिंदे, वाशिम

श्रीमती गंगासागर उत्तम शिंदे, उस्मानाबाद

 

कबड्डी

श्री. विकास बबन काळे, पुणे

श्रीमती सायली संजय केरीपाळे, पुणे

 

कुस्ती

श्री. उत्कर्ष पंढरीनाथ काळे, पुणे

श्रीमती रेश्मा अनिल माने,कोल्हापूर

 

खो-खो

श्री.अनिकेत भगवान पोटे, मुंबई उपनगर

श्रीमती ऐश्वर्या यशवंत सावंत, रत्नागिरी

 

बुध्दीबळ

श्री. राकेश रमाकांत कुलकर्णी, ठाणे( थेटपुरस्कार )

श्रीमती दिव्या जितेंद्र देशमुख नागपूर( थेट पुरस्कार )

श्री. रोनक भरत साधवानी, नागपूर ( थेटपुरस्कार )

श्रीमती सलोनी नरेंद्र सापळे ,पुणे

श्री. हर्षिद हरनीश राजा , पुणे ( थेट पुरस्कार )

 

लॉन टेनिस

श्रीमती ऋतुजा संपतराव भोसले,पुणे

 

व्हॉलीबॉल

श्रीमती प्रियांका प्रेमचंद बोरा,पुणे

 

सायकलिंग

श्री रविंद्र बन्सी करांडे, अहमदनगर

श्रीमती वैष्णवी संजय गभणे, भंडारा

 

स्कॅश

श्री महेश दयानंद माणगावकर, मुंबई उपनगर (थेट पुरस्कार)

श्रीमती उर्वशी जोशी , ठाणे

 

क्रिकेट

श्रीमती स्मृती मानधना, सांगली

 

हॉकी

श्री.सुरज हरिशचंद्र करकेरा, मुंबई

 

एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू )( सन 2017-18 )

श्री.संदिप प्रल्हाद गुरव, रायगड, व्हीलचेअर-तलवारबाजी, (थेट पुरस्कार)

श्रीमती मानसी गिरीशचंद्र जोशी, मुंबई, बॅडमिंटन,(थेट पुरस्कार)

श्री.मार्क जोसेफ धर्माई, मुंबई उपनगर, बॅडमिंटन, (थेट पुरस्कार)

श्रीमती रुही सतीश शिंगाडे, पालघर, बॅडमिंटन (थेट पुरस्कार)

श्री.सुकांत इंदुकांत कदम, सांगली , बॅडमिंटन, (थेट पुरस्कार)

श्रीमती गीतांजली चौधरी, (जलतरण ) (ठाणे)

श्री.स्वरुप महावीर उन्हाळकर, कोल्हापूर, नेमबाजी, (थेट पुरस्कार) –

श्री.चेतन गिरीधर राऊत, अमरावती , (जलतरण ) –

श्री.आदिल मोहमंद नाझिर अन्सारी, आर्चरी , (थेट पुरस्कार) –

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( साहसी) ( सन 2017-18)

श्रीमती प्रियांका मंगेश मोहिते, (गिर्यारोहण),(सातारा)

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( संघटक/कार्यकर्ते ) ( सन 2017-18 )

मुंबई- श्री.अंकुर भिकाजी आहेर, ठाणे

पुणे- श्री.महेश चंद्रकांत गादेकर,सोलापूर

कोल्हापूर- श्री.मुन्ना बंडू कुरणे, सांगली

अमरावती- डॉ.नितीन गणपतराव चवाळे,अमरावती

नाशिक- श्री.संजय आनंदराव होळकर,नाशिक

औरंगाबाद-

लातूर- श्री.जनार्दन एकनाथ गुपिले,नांदेड

नागपूर- श्री.राजेंद्र शंकरराव भांडारकर,भंडारा

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघविनोद तावडे