Join us

आयपीएल : 'गब्बर'ची अकरा वर्षांनंतर 'घरवापसी'

धवनने 2008 साली दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवा केली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून तो खेळला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 14:16 IST

Open in App
ठळक मुद्देया हंगामात 'ट्रेडिंग विंडो'मधून दिल्लीने पुन्हा एकदा धवनला आपल्या संघात सामील केले आहे.

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवनचीआयपीएलच्या संघात तब्बल अकरा वर्षांनी घरवापसी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. धवनने 2008 साली दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवा केली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून तो खेळला होता. पण या हंगामात 'ट्रेडिंग विंडो'मधून दिल्लीने पुन्हा एकदा धवनला आपल्या संघात सामील केले आहे.

हैदराबादच्या संघाने 'राइट टू मैच कार्ड'नुसार धवनला आपल्या संघात कायम ठेवले होते. त्यासाठी 5.2 कोटी रुपये मोजल हैदराबादने धवनला आपल्या संघात कायम ठेवले होते. पण दिल्लीच्या संघाने 'ट्रेडिंग विंडो'मधून आपले तीन खेळाडू हैदराबादला दिले आणि त्याबदल्यात धवनला आपल्या संघात सामील करून घेतले. 

टॅग्स :शिखर धवनआयपीएलआयपीएल लिलाव