Join us

Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी

काय आहे नेमकं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:01 IST

Open in App

Shikhar Dhawan Summoned By ED In Connection With The Case Involving Betting App  : भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याला अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं नोटीस धाडली आहे. ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार,  1xBet नावाच्या अवैध बेटिंग अ‍ॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात क्रिकेटरची कसून चौकशी केली जाणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

PMLA अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत ईडीकडून 1xBet नावाच्या 'अवैध' सट्टेबाजी अ‍ॅपसंदर्भातील प्रकरणाचा तपास सुरु आहे. संबंधित  बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक लोक आणि गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या जाहिरातीत दिसल्यामुळे या प्रकरणात  शिखर धवनचा जबाब नोंदवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ऑनलाईन रियल मनी गेमिंग प्लेटफॉर्म बंद करण्यासाठी विधेयक आणले आहे. त्यामुळे सट्टेबाजीच्या माध्यमातून फसवणूकीच्या प्रकाराचा खेळ आता खल्लास झाला आहे. आता ईडीनं आपला तपास अधिक वेगवान केला असून या प्रकरणात काय समोर येणार ते पाहण्याजोगे असेल.   

गब्बर आधी या क्रिकेटर्सला ईडीनं धाडली होती नोटीस

ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपसंदर्भातील प्रकरणात शिखर धवन आधी अन्य काही क्रिकेटर्संही ईडीच्या रडारवर आल्याचे पाहायला मिळाले आहे. यात भारताचा माजी अष्टपैलू आणि  IPL स्पेशलिस्ट सुरेश रैनासह हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांचीही ईडीनं चौकशी कोली होती. क्रिकेटर्सशिवाय अन्य काही सेलिब्रिटींही ईडीच्या चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. रैनाची तब्बल ८ तास चौकशी झाली होती. 

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून सोशल मीडियावर अधिक सक्रीय दिसतो धवन

शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. २०२२ मध्ये तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २०२४ च्या आयपीएल हंगामानंतर त्याने या लीग स्पर्धेतूनही निवृत्ती घेतली आहे. सलामीवीराच्या रुपात त्याच्या नावे काही खास रेकॉर्ड आहेत. क्रिकेटच्या मैदानात तो दिसत नसला तरी सोशल मीडियावर हा क्रिकेटर चांगलाच सक्रीय दिसतो.  

टॅग्स :शिखर धवनक्रिकेट सट्टेबाजीऑफ द फिल्ड