Join us  

Shikhar Dhawan Preity Zinta Gym Video: "छोटी बच्ची हो क्या?" शिखर धवनने प्रिती झिंटासोबतचा जिममधील व्हिडीओ केला पोस्ट

तुम्ही पाहिलात का धवनचा मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 6:28 PM

Open in App

Shikhar Dhawan Preity Zinta Gym Video: टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. धवन त्याच्या अकाऊंटवरून मजेदार व्हिडिओ शेअर करून कायम चाहत्यांना हसवत असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पंजाब किंग्ज (PBKS) ची मालकीणबाई प्रीती झिंटासोबत जिम करताना दिसत आहे.

शिखर धवनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही जिम करत आहेत. पण त्यासोबत ते दोघे धमाल-मस्ती करतानाही दिसत आहेत. शिखरने व्हिडिओमध्ये फेमस म्युझिकचा वापर मीम म्हणून केला आहे. धवनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक उत्तम जिम सेशन.' सोशल मीडियावर धवन आणि प्रिती झिंटाचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला.

दरम्यान, शिखर धवन IPL 2022 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. धवनने पंजाब किंग्ज (PBKS) साठी ११ सामन्यांमध्ये ४२.३३ च्या सरासरीने ३८१ धावा केल्या आहेत. या डावखुऱ्या फलंदाजाने IPLच्या चालू हंगामात आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावली आहेत. शिखर धवन हा IPL 2022 च्या लिलावात खरेदी केलेला पहिला खेळाडू होता. धवनला पंजाब किंग्जने मेगा लिलावात ८ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले. IPLच्या मागील तीन हंगामात धवन दिल्ली कॅपिटल्सचा (DC) भाग होता.

टॅग्स :आयपीएल २०२२शिखर धवनप्रीती झिंटापंजाब किंग्स
Open in App