मोहाली : ‘निराशाजनक कालखंडात होणाऱ्या टीकेकडे लक्ष देत नसल्यामे खडतर कालखंडात सावरण्यात यशस्वी ठरतो,’ असे भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन म्हणाला. टीकाकारांचे लक्ष्य ठरल्यानंतर धवन शानदार पद्धतीने पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला.
धवन म्हणाला, ‘मी माझ्या जगात जगतो. त्यामुळे मानसिकरीत्या शांत राहण्यास मदत मिळते. मी वृत्तपत्र वाचत नाही. मला पटत नसलेला सल्लाही घेत नाही. त्यामुळे माझ्या आजूबाजूला काय घडत आहे, याची कल्पना नसते. मी आपल्याच जगात वावरत असतो. त्यामुळे मला स्वत:चे निर्णय घेता येतात. तसेच स्वत:शी बोलून नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करतो. मी वास्तव स्वीकारुन पुढे वाटचाल करतो.’