Join us

Shikhar Dhawanचा हुमा कुरेशीच्या हातात हात घालून डान्स; दोघांचा रोमँटिक अंदाज, Photo Viral

सोशल मीडियावर शिखर धवनची हवा एका वेगळ्याच कारणाने सुरू झाली आहे. #ShikharDhawan हा ट्रेंड सध्या बॉलिवूड अभिनेत्री Huma Qureshi हिच्यामुळे सुरू झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:19 IST

Open in App

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा वन डे सामना दिल्लीत खेळला जातोय. शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरला आहे. पण, सोशल मीडियावर शिखर धवनची हवा एका वेगळ्याच कारणाने सुरू झाली आहे. #ShikharDhawan हा ट्रेंड सध्या बॉलिवूड अभिनेत्री Huma Qureshi हिच्यामुळे सुरू झाला आहे. हुमाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शिखर सोबत डान्स करतानाचे फोटो पोस्ट केल्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला आहे. 

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा 'Double XL' हा चित्रपट लवकरच प्रदर्शीत होणार आहे. आपल्या स्वप्नांच्या शोधात असलेल्या दोन महिलांची ही कथा आहे. नवी दिल्ली, मेरठ आणि मुंबईवर आधारित या चित्रपटात झहीर इक्बाल आणि महत राघवेंद्र यांच्यासोबत सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी देखील दिसणार आहेत. या चित्रपटातून भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

शिखर म्हणाला की, ''खेळाडू म्हणून आयुष्य नेहमीच व्यग्र असते. चांगले मनोरंजन करणारे चित्रपट पाहणे हा माझा छंद आहे.  जेव्हा ही संधी माझ्याकडे आली आणि मी ही कथा ऐकली तेव्हा त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला. हा चित्रपट समाजासाठी एक सुंदर संदेश देणारा आहे. मला आशा आहे की अनेक तरुण मुली आणि मुले काहीही झाले तरी त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहतील.'' ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :शिखर धवनहुमा कुरेशीसोनाक्षी सिन्हा
Open in App