Join us

शिखर धवनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल...

धवनला वडिलांनी कानशिलात लगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 05:27 IST

Open in App

मुंबई : आयपीएलमध्ये पंजाब संघ क्वालिफायर सामन्याआधीच बाहेर पडला. या संघाचा आधारस्तंभ सलामीवीर शिखर धवनने  सहकारी खेळाडूंसोबत धमाल केली.  एक नवीन रील शेअर केला असून त्यात त्याचे वडील त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. वडील त्याच्या कानाखाली मारतात. त्यानंतर त्याला बुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर पाडतात आणि मग लाथा मारताना दिसत आहेत.  

वडिलांच्या आजूबाजूचे लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये एक जण पोलीसांच्या वेशात आहे.  इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला.  खरोखरच धवन बाप-बेट्यांमध्ये काही वाद झाला का असे वाटेल.  हा व्हिडीओ धवनने केवळ मनोरंजन म्हणून बनवला. त्यात वाक्य लिहिले, ‘आमचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला नाही म्हणून माझ्या वडिलांनी मलाच नॉक आऊट केले.’ या व्हिडीओवर ५ हजार ८०० हून अधिक कमेंट्स आल्या असून  ४ लाख ९६ हजारहून अधिक लाइक्स आहेत.

टॅग्स :शिखर धवनआयपीएल २०२२
Open in App