Join us

Shikhar Dhawan: मुलाला पाहून शिखर धवन झाला भावूक, दोन वर्षानंतर झाली बाप-लेकाची भेट

Shikhar Dahwan: शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या घटस्फोटानंतर जोरावर आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 15:58 IST

Open in App

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन त्याच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी त्याचा मुलगा जोरावरला भेटला आहे. धवनने आपल्या मुलासोबतच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शिखर धवन आणि आयेशा यांच्या घटस्फोटानंतर जोरावर त्याच्या आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो. आयेशाला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. धवनने त्यांनाही आपले नाव दिले होते. तर, आयेशा आणि धवन यांना जोरावर हा मुलगा झाला. 

2020 पासून ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनामुळे अनेक निर्बंध आले आहेत. तिथला प्रोटोकॉलही खूप कडक आहे. त्यामुळे शिखर आपल्या मुलाला भेटू शकला नव्हता. अखेर दोन वर्षानंतर जोरावर त्याची बहीण आलियासोबत वडिलांना भेटण्यासाठी भारतात पोहोचले. पुढील महिन्यापासून शिखर आयपीएल लीगमध्ये व्यस्त असेल. त्यामुळे सध्या तो आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात गब्बरला पंजाब किंग्जने विकत घेतले आहे. 

गेल्या वर्षी झाला घटस्फोटशिखर धवनचा पत्नी आयशा मुखर्जीसोबत गेल्या वर्षी घटस्फोट झाला होता. आयशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली होती. मात्र, शिखरने त्याच्या घटस्फोटाबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही. धवनच्या काही जवळच्या मित्रांनी सांगितले की, त्यावेळेस शिखरला घटस्फोट नको होता, तो त्याचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण, आयेशाला घटस्फोट हवा असल्याने दोघे विभक्त झाले.  

टॅग्स :शिखर धवनऑफ द फिल्ड
Open in App