Shikha Pandey Enter Most Expensive Player List In WPL History : वीमेन्स प्रीमियर लीग (WPL 2026) च्या मेगा लिलावात भारतीय UP वॉरियर्सच्या संघाने सर्वाधिक महिला खेळाडूंना कोट्यधीश केल्याचे पाहायला मिळाले. या यादीत वेगवान गोलंदाज शिखा पांडेचाही समावेश आहे. जवळपास ३ वर्षे भारतीय संघातून बाहेर असलेल्या ३६ वर्षीय शिखा पांडेनं २० लाख रुपयांसह मेगा लिलावात नाव नोंदणी केली होती. UP वॉरियर्सनं तिला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी तब्बल २.४० कोटी एवढी मोठी रक्कम मोजली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोट्यवधींच्या प्राइज टॅगसह शिखाच्या नावे झाला खास विक्रम
यंदाच्या हंगामात मिळालेल्या कोट्यवधीच्या टॅगसह शिखा आता WPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय महिला खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहचली आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर या स्टार महिला खेळाडूनंतर आता शिखाचा नंबर लागतो. यंदाच्या हंगाम सर्वाधिक बोली लागलेली दीप्ती शर्मा हिच्यानंतर ती भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधीच्या तीन WPL हंगामात शिखा पांडे दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसली होती. जुन्या फ्रँचायझी संघाने तिला भाव दिला नाही. पण UP च्या संघाने अनुभवी खेळाडूवर पैशांची अक्षरश: 'बरसात' केल्याचे पाहायला मिळाले.
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
शिखाला एवढी मोठी रक्कम मिळेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती, कारण...
गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असल्यामुळे आणि वयाच्या ३६ व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे या भारतीय जलदगती गोलंदाजाला कोट्यवधीचा भवा मिळेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. त्यामुळे ही बोली अधिक लक्षवेधी ठरली. शिखा पांडेला संघात घेण्यासाठी यूपी वॉरियर्स आणि RCB यांच्यात चुरस पाहायला मिळाली. ५० लाखांपासून सुरु झालेली बोली बघता बघता कोटींच्या घरात गेली. RCB नं तिच्यावर २ कोटींची बोली लावल्यावर UP वॉरियर्सच्या संघाने २.४० कोटीसह शिखाला आपल्या संघात घेण्याचा फायनल डाव साधला.
देशातील तरुणाईसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे हा चेहरा
क्रिकेटच्या मैदानात आपल्या गोलंदाजीची खास छोप सोडणारी शिखा पांडे ही भारतीय हवाई दलात अधिकारी पदावर आहे. २०११ मध्ये ती एअरफोर्समध्ये भरती झाली होती. २०२० मध्ये ती स्क्वाड्रन लीडर पदावर पोहोचली. क्रिकेट आणि हवाई दलातील सेवा या दुहेरी भूमिकेमुळे ती तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ठरते.
शिखा पांडेचा WPL मधील रेकॉर्ड
- एकूण सामने: २७
- एकूण विकेट्स: ३०