Join us

ती म्हणाली, ‘जोस बटलर माझा दुसरा पती!’

बटलरच्या फटकेबाजीनंतर लॉराची नेहमीच पंचाईत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 05:17 IST

Open in App

कोलकाता : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॉसी वान डेर दुसेनची पत्नी लॉरा गमतीने म्हणते, ‘जोस बटलरला मी दुसरा पती म्हणून स्वीकारले आहे.’ त्याचे कारणही तसेच आहे. आयपीएल सामन्यात बटलरने षटकार  मारताच कॅमेऱ्यांचा फोकस लॉरावर असतो. चाहते लॉराला दुसेनची पत्नी न मानता बटलरचीच पत्नी समजतात. मात्र लॉराने आता स्पष्ट केले की मी बटलरची नव्हे तर दुसेनची पत्नी आहे.

बटलरच्या फटकेबाजीनंतर लॉराची नेहमीच पंचाईत होते. लॉराने राजस्थानच्या पॉडकॉस्टवर सांगितले की, माझ्या मते मी आता बटलरला दुसरा पती म्हणून स्वीकारायला हवे.  मला जोस बटलरची पत्नी लुईसच्या नावाने ओळख लाभली आहे.  

पण मी लुईस नाही. 

लुईसशी माझी कधीही भेट झालेली नाही.  लोकांना वाटते की मी जोसची पत्नी आहे.  युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीसोबत मी राजस्थान रॉयल्सला चीअर्स करीत असल्याने चाहते मला बटलरचीच पत्नी समजतात. मात्र मी बटलरला आयपीएलदरम्यान नेहमी सपोर्ट करणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२जोस बटलर
Open in App