Join us

धोनी स्टाईलमध्ये षटकार लगावत तिने जिंकला सामना, पाहा हा व्हिडीओ

इंग्लंडमधील एका लीगमध्ये कौरने धोनी स्टाईलमध्ये हा सामना संपवला असून आयसीसीने तिच्या षटकाराचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 20:41 IST

Open in App
ठळक मुद्देअखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर कौरने चौकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर कौरने दमदार षटकार लगावत धोनी स्टाईलमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.

लंडन : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला होता. भारतीय चाहते हा क्षण कधीही विरसू शकत नाही. या स्टाईलची पुनरावृत्ती केली आहे ती भारताची महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने. इंग्लंडमधील एका लीगमध्ये कौरने धोनी स्टाईलमध्ये हा सामना संपवला असून आयसीसीने तिच्या षटकाराचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

इंग्लंडमध्ये महिला क्रिकेट सुपर लीग सुरु आहे. या लीगमध्ये लँकाशायर थंडर या संघाकडून कौर खेळत होती. संघाला विजयासाठी अखेरच्या तीन चेंडूंमध्ये आठ धावांची गरज होती. अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर कौरने चौकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर कौरने दमदार षटकार लगावत धोनी स्टाईलमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.

हरमनप्रीत कौरने असा षटकार लगावला, पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :क्रिकेटक्रीडा