Join us

पाकचा पराभव झाला की मला पत्रकारांसमोर पाठवतात: शॉन टेट

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय मीडियासमोर इभ्रत निघाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 09:46 IST

Open in App

लाहोर: इंग्लंडविरुद्धच्या सहाव्या टी-२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकने गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेटला पत्रकार परिषदेला पाठवले. मात्र या वेळी त्याच्या एका विधानाने खळबळ उडाली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या माध्यम सन्मवयकाने त्याचा माईकच चक्क बंद केला. टेटला सुरुवातीला काय झाले हे कळलेच नाही आणि नंतर मात्र तो रागाने लालबुंद झाला होता.

पत्रकार परिषद सुरू असताना टेट म्हणाला की, 'पाकिस्तानचा संघ जेव्हाही पराभूत होतो, तेव्हा संघ व्यवस्थापन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मला पुढे करतात.' त्यांच्या या वाक्यानंतर माध्यम समन्वयकाने त्याचा माईक बंद केला आणि टेटला म्हणाला की, 'तू नक्की ठीक आहेस आहेस ना?' यावर टेटनेही हो असे उत्तर दिले. या घटनेनंतर पत्रकार परिषद सुरू राहिली, पण पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय मीडियासमोर इभ्रत निघाली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पाकिस्तान
Open in App