कराची : पाकिस्तान कसोटी संघाचा बंदी असलेला फलंदाज शार्जिल खान याने स्थानिक क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन व्हावे, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने लावलेले पाच आरोप मान्य असल्याचे कबूल केले.
शार्जिलवर २०१७ मध्ये पाक सुपर लीगदरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्याचे वकील एजाज यांनी पीसीबी अध्यक्षांना एक निवेदन दिले होते. भ्रष्टाचारविरोधी पथकाने शार्जिलवर लावलेले पाचही आरोप त्याने स्वीकारले असल्याचे एजाज यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)