Join us

शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार, 50 दिवस क्रिकेटपासून दूर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरला दुखापतीमुळे 7 ते 8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 10:00 IST

Open in App

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरला दुखापतीमुळे 7 ते 8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिका आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांपर्यंत तो भारतीय संघासाठी उपलब्ध नसणार आहे. मात्र, शार्दूलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

''मी कितीही मेहनत घेतली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्णपणे फिट होऊ शकणार नाही. त्यामुळे मी वन डे मालिकेत पुनरागमन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील सात आठवडे सरावावर भर देणार आहे,'' असे शार्दूलने सांगितले.

दुखापतीमुळे त्याला दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांतून माघार घ्यावी लागली होती. आशिया चषक स्पर्धेत हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याने दुखापतीमुळे सामना सोडला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अवघे 10 चेंडू टाकून तो तंबूत परतला होता. 

टॅग्स :शार्दुल ठाकूरबीसीसीआय