Join us

Shardul Thakur vs Gabbar Shikhar Dhawan, Video: IPL च्या मैदानात रंगला Sholay चा सामना... ठाकूरने केला गब्बरचा खेळ खल्लास; भन्नाट स्विंगमुळे धवनचं स्वस्तात 'पॅक-अप'

शार्दुल ठाकूरच्या अप्रतिम गोलंदाजीने 'गब्बर'चा डाव आटोपला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 15:12 IST

Open in App

Shardul Thakur vs Gabbar Shikhar Dhawan, Video: शार्दुल ठाकूरने घेतलेले ४ बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी मिळालेली साथ याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा मिचेल मार्श याने ६३ धावा करत संघाला १५९ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात पंजाबच्या वरच्या फळीने निराशा केली. भरवशाचा मानला जाणारा सलामीवीर शिखर धवन याने स्वस्तात आपली विकेट बहाल केली. पंजाबच्या या 'गब्बर' फलंदाजाला शार्दुल 'ठाकूर'ने तंबूत धाडलं आणि त्याचा खेळ खल्लास केला.

दिल्लीने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टोने दमदार सुरूवात करत १५ चेंडूत २८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पंजाबच्या इतर फलंदाजांनी प्रचंड निराशा केली. चांगल्या फॉर्मात असणारा सलामीवीर शिखर धवन १९ धावा काढून माघारी परतला. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गब्बरला शार्दुल ठाकूरने बाद केले. विचित्र उंचीवर आलेला चेंडू स्विंग झाल्याने धवन बाद झाला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, गब्बर बाद झाल्यानंतर भानुका राजपक्षे (४), लियम लिव्हिंगस्टोन (३), हरप्रीत ब्रार (१), कर्णधार मयंक अग्रवाल (०), रिषी धवन (४) सारेच झटपट बाद झाले. जितेश शर्माने फटकेबाजी करत पंजाबच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत त्यांच्या आशा संपवल्या. त्याने ३४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४४ धावा केल्या. त्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स :आयपीएल २०२२शार्दुल ठाकूरशिखर धवनदिल्ली कॅपिटल्स
Open in App