Mumbaikar Shardul Thakur Hat-Trick In Ranji Trophy : रणजी करंडक स्पर्धेतील मेघालय विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या ताफ्यातून खेळणाऱ्या भारताचा स्टार ऑलराउंडर शार्दुल ठाकूरनं हॅटट्रिकचा डाव साधलाय. मुंबईतील बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमी ग्राउंडवर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली. मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅप्टनचा हा निर्णय सार्थ ठरवत शार्दुल ठाकूरनं प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडेच मोडलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन षटकात पूर्ण केली प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिली हॅट्रिक
मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर शार्दुल ठाकूर पहिल्याच षटकात गोलंदाजीला आला. त्याने डावाच्या पहिल्या षटकातील चार चेंडू निर्धाव टाकल्यावर त्याने मेघालय संघाचा सलामीवीर निशांत चक्रवर्तीला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर शार्दुलनं त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या बी. अनिरुद्धलाही आल्या पावली परत धाडले. पहिल्या षटकातील अखेरच्य २ चेंडूवर दोन विकेट्स घेणाऱ्या शार्दुल ठाकूरनं मेघालयच्या डावातील तिसऱ्या आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जसकीरतची विकेट घेत प्रथम श्रेणीतील पहिल्या वहिल्या हॅट्रिकचा डाव साधला.
आधीच्या मॅचमध्ये कडक बॅटिंग, पहिल्या डावात अर्धशतक अन् मग शतकी डाव
याआधीच्या सामन्यात शार्दुल ठाकूरनं बॅटिंगमध्ये कमाल दाखवली होती. जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात मुंबईची बॅटिंग ऑर्डर कोसळल्यावर शार्दुल ठाकूरनं पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या डावात पुन्हा मुंबईच्या ताफ्यातील आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. मग शार्दुल ठाकूर पुन्हा मदतीला धावला. त्याने कडक सेंच्युरी मारली. पण त्याचं हे शतक व्यर्थ ठरलं. कारण जम्मू काश्मीरनं या सामन्यात फायनल बाजी मारली.
Web Title: Shardul Thakur Records Hat-Trick For Mumbai In Must Win Ranji Trophy 2025 Match Against Against Meghalaya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.