Sharad Pawar reaction Shane Warne Death : शरद पवार यांनी शेन वॉर्नच्या निधनावर ट्वीट करत व्यक्त केलं दु:ख, म्हणाले...

शेन वॉर्नने ५२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 09:54 PM2022-03-04T21:54:36+5:302022-03-04T21:56:10+5:30

whatsapp join usJoin us
Sharad Pawar expressed grief over Shane Warne demise due to heart attack see tweets | Sharad Pawar reaction Shane Warne Death : शरद पवार यांनी शेन वॉर्नच्या निधनावर ट्वीट करत व्यक्त केलं दु:ख, म्हणाले...

Sharad Pawar reaction Shane Warne Death : शरद पवार यांनी शेन वॉर्नच्या निधनावर ट्वीट करत व्यक्त केलं दु:ख, म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sharad Pawar reaction Shane Warne Death : दिग्गज लेग स्पिनर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. शेन वॉर्न हा थायलंडमध्ये असताना शुक्रवारी संध्याकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली. शेन वॉर्न हा त्याच्या विलामध्ये असताना त्याला हार्ट अँटक आल्या. त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले पण त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही, असं जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. शेन वॉर्नच्या निधनानंतर केवळ क्रिकेटविश्वच नव्हे तर सर्व स्तरातून त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

"महान लेगस्पिनर शेन वॉर्न याच्या अकाली निधनाची बातमी ऐकून अत्यंत धक्का बसला आणि दु:ख झाले. आज जगाने क्रिकेटमधील सर्वकालीन महान नायक गमावला आहे. त्याची क्रिकेटमधील उल्लेखनीय आणि गौरवशाली कारकीर्द पुढील पिढ्यांसाठी आणि विशेषत: जगभरातील तरुण गोलंदाजांसाठी प्रेरणादायी ठरेल. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो", असं ट्वीट करत शरद पवार यांनी शोक व्यक्त केला.

दरम्यान, शेन वॉर्नच्या निधनाबद्दल क्रिकेट विश्वातूनही दिग्गजांनी शोक व्यक्त केला. त्याचा मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी आणि मैदानाबाहेरील मित्र असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही त्याच्या निधनानंतर एक भावनिक ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं. "धक्कादायक, स्तब्ध करणारी आणि मन सुन्न करणारी (बातमी)… वॉर्नी तुझी आठवण येईल. तू आजूबाजूला असताना मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही कंटाळा आला नाही. तुझा खेळकर स्वभाव खूपच मस्त होता. मैदानावर असताना आपल्यातील झुंज आणि मैदानाबाहेरची आपली मैत्रिपूर्ण भांडणं कायम स्मरणात राहतील. भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुझं नेहमीच एक खास स्थान होतं. तू फार लवकर आमच्यातून निघून गेलास", असं ट्वीट सचिनने केलं.

Web Title: Sharad Pawar expressed grief over Shane Warne demise due to heart attack see tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.