शामी पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोका देणार नाही - धोनी

शामीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. पण तिच्या आरोपांच्या फेरी संपल्यावर मात्र तिच्या चरीत्राबद्दल बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या आहेत. सोमवारी तर हसीनच्या वडिलांनीच शामीची बाजू घेतल्यामुळे तिची बाजी कमकुवत झाल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 13:20 IST2018-03-12T13:20:12+5:302018-03-12T13:20:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shami will not jeopardize his wife and country for money - Dhoni | शामी पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोका देणार नाही - धोनी

शामी पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोका देणार नाही - धोनी

ठळक मुद्देशामीला पाठिंबा द्यायला धोनीसह सासरेही सरसावले

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला पाठिंबा द्यायला आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढे आला आला. त्याचबरोबर शामीचे सासरे मोहम्मद हसन यांनीही त्याची बाजू घेतली आहे. शामी पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले आहे.

शामीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. पण तिच्या आरोपांच्या फैरी संपल्यावर मात्र तिच्या चरीत्राबद्दल बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या आहेत. सोमवारी तर हसीनच्या वडिलांनीच शामीची बाजू घेतल्यामुळे तिची बाजी कमकुवत झाल्याचे म्हटले जात आहे.

भारताचा माजी कर्णधार धोनीने यावेळी शामीला पाठिंबा दशर्वला आहे. शामीबाबत धोनी म्हणाला की, " शामी हा एक चांगला व्यक्ती आहे. तो पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोकाच देऊ शकत नाही. कारण तो एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून कसा आहे, हे मी चांगलेच जाणतो. बाकी जे काही आरोप शामीच्या पत्नीने त्याच्यावर केले आहेत त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण ती त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्याविषयी बोलणे उचित ठरणार नाही. " 

हसीनने शामीवर केलेले आरोप हे त्याच्या सासऱ्यांना प्रसारमाध्यमांमुळे माहिती झाले. याबबात ते म्हणाले की,  " हसीनने या गंभीर बाबींबाबत मला कधीही काहीच सांगितले नाही. त्यामुळे या भांडणाबाबत मला जास्त काहीच माहिती नाही. पण शामी हा एक शांत स्वभावाचा माणूस आहे. तो मितभाषीही आहे. हसीनने शाळेपासूनच आपल्याला काय व्हायचे आहे, हे ध्येय डोळ्यापुढे ठेवले होते. या ध्येयापासून ती कधीही मागे हटणारी नाही.

Web Title: Shami will not jeopardize his wife and country for money - Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.