बांगलादेशच्या विजयात शकिबची अष्टपैलू कामगिरी

शकिबने नाबाद 42 धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर पाच बळी मिळवत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:42 IST2018-12-20T20:42:07+5:302018-12-20T20:42:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shakib's all-round performance in Bangladesh's victory | बांगलादेशच्या विजयात शकिबची अष्टपैलू कामगिरी

बांगलादेशच्या विजयात शकिबची अष्टपैलू कामगिरी

ढाका : शकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत वेस्ट इंडिजवर 36 धावांनी विजय मिळवला. शकिबने नाबाद 42 धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर पाच बळी मिळवत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. 

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या निर्णयाचा चांगलाच फायदा बांगलादेशने उचलला. सलामीवीर लिटॉन दासने 34 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 60 धावा केल्या. शकिबने 26 चेंडूंत 5 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 42 धावा केल्या. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने 211 धावांचा डोंगर उभाररला. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 175 धावांवर संपुष्टात आला.




Web Title: Shakib's all-round performance in Bangladesh's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.