Join us
Daily Top 2Weekly Top 5

WI vs NZ : शाई होपची विक्रमी सेंच्युरी! लाराला मागे टाकत गेल-कोहलीची बरोबरी, पण...

लारापेक्षाही जलदगतीने पार केला वनडेत ६००० धावांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:22 IST

Open in App

 Shai Hope Surpasses Brian Lara With ODI Century Also Equals Virat Kohli : वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार शाई होप याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ६६ चेंडूत शतक साजरे करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. न्यूझीलंडच्या मैदानात कॅरेबियन पठ्ठ्याच्या बॅटमधून आलेली ही पहिली शतकी खेळी ठरली. वनडे कारकिर्दीतील १९ व्या शतकासह होपनं ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढताना विराट कोहली आणि ख्रिस गेल या दिग्गजांच्या खास विक्रमाशी बरोबरी केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लारापेक्षाही जलदगतीने पार केला वनडेत ६००० धावांचा टप्पा

नेपियरच्या मैदानात रंगलेल्या एकदिवसीय सामन्यात होपनं वनडेत सर्वात जलद ६००० धावांचा टप्पा गाठण्याच्या बाबतीत ब्रायन लाराला मागे टाकले. वेस्ट इंडिजकडून सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत महान व्हिव्हियन रिचर्ड्स अव्वलस्थानी आहेत. लारानं हा टप्पा गाठण्यासाठी १५५ डाव घेतले होते. याशिवाय कॅरेबियन संघाकडून सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही होप लाराची बरोबरी केली. या दोघांच्या पुढे फक्त ख्रिस गेल आहे. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत २५ शतके झळकावली आहेत. हा विक्रमही तो येत्या काळात अगदी सहज मागे टाकेल.

"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा

गेल आणि कोहलीच्या विक्रमाचीही बरोबरी

सर्वाधिक देशांविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या खेळांडूच्या यादीत शाई होपनं विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची बरोबरी केली आहे. तिघांनीही १० देशांविरुद्ध शतके झळकावली आहेत. या यादीत मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या अव्वलस्थानी आहे. दोघांनी प्रत्येकी १२-१२ देशांविरुद्ध शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

शतकी खेळीनं मैफील लुटली, पण वेस्ट इंडिजनं मॅच नाही जिंकली

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील वादळी शतकासह होपनं अनेक विक्रमाला गवसणी घातली. पण न्यूझीलंडच्या कर्णधाराच्या छोट्या पण धमाकेदार खेळीसमोर त्याचे विक्रमी शतक व्यर्थ ठरले. धावांचा पाठलाग करताना डकवर्थ लुईसप्रमाणे न्यूझीलंडच्या संघाने ५ विकेट्स राखून विजय नोंदवला. अखेरच्या षटकात मिचेल सँटनर याने १५ चेंडूत ३४ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shai Hope's Century Breaks Records, But West Indies Loses to NZ

Web Summary : Shai Hope's record-breaking century equaled Kohli and surpassed Lara. He reached 6000 ODI runs faster than Lara. Hope equaled Gayle with centuries against 10 countries. However, New Zealand won by 5 wickets due to Santner's explosive innings.
टॅग्स :वेस्ट इंडिजन्यूझीलंडविराट कोहली