Shai Hope Eye Infection NZ vs WI: वेस्ट इंडिजचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांनी अलीकडेच टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळली. आता तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्चमधील हेग्ली ओव्हल येथे खेळवण्यात आला. या सामन्याच्या शेवटच्या डावात वेस्ट इंडिजच्या स्टार फलंदाजाने झुंजार कामगिरी केली. डोळ्याच्या संसर्गानंतरही त्याने फलंदाजी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आणि शानदार शतक ठोकले.
शाय होपची लढाऊवृत्ती
सामन्याच्या शेवटच्या डावात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ५३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडिजने फक्त ७४ धावांत चार विकेट गमावल्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शाई होपने शानदार खेळी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शाई होपला डोळ्याच्या अॅलर्जीमुळे मैदानाबाहेर राहावे लागले. पण चौथ्या दिवशी संघाची अवस्था पाहून त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो गॉगल घालून क्रीजवर आला आणि त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा करण्यात यशस्वी झाला.
दमदार शतकासह डाव सावरला
शाय होपने एका बाजूने किल्ला लढवत १३९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण करताना त्याने १४ चौकार आणि एक षटकार मारला, जे त्याचे चौथे कसोटी शतक होते. उल्लेखनीय म्हणजे, त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात १०७ चेंडूत ५६ धावा करत अर्धशतकही केले होते. तथापि, पहिल्या डावात त्याचा संघ फक्त १६७ धावांवर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने दमदार शतक ठोकत संघाच्या आशा पल्लवित केल्या.
चौथ्या दिवसअखेर सामन्यात रंगत
दरम्यान, न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २२१ धावा केल्या तर विंडिजने १६७ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने ८ बाद ४६६ धावांवर डाव घोषित केला. आता चौथ्या दिवसाचा खेळ संपलेला असताना, शाय होपच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजची धावसंख्या ४ बाद २१२ आहे. शाय होप नाबाद ११६ धावा केल्या तर