Shahrukh Khan on Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने वन डे क्रिकेटमधील शतकांचा तीन वर्षांचा दुष्काळ काल संपवला. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात रोहितने ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांची खेळी केली. रोहितच्या या शतकाआधी बॉलिवूड अभिनेता आणि आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सह मालक शाहरुख खान याला रोहितबाबत एका वाक्यात काय सांगशील, असा प्रश्न फॅनने केला होता. त्यावर शाहरुखने उत्तर दिले अन् दुसरीकडे रोहितने शतक झळकावले. शाहरुखचा पठाण हा चित्रपट आज प्रदर्शीत झाला आणि काल किंग खानने सोशल मीडियावर फॅनसोबत गप्पा मारल्या.
यावेळी रोहित शर्माबद्दल एक प्रश्न विचरण्यात आला, त्याला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल एका ओळीत काहीतरी सांगण्यास सांगितले, ज्याला शाहरुखनेही उत्तर दिले. ''रोहित हुशार आहे. त्याच्यासोबत काही गोड क्षण शेअर केले आहेत.''
शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २५ तारखेला प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही मोठा विरोध होत आहे. शाहरुख खान आणि त्याची संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत गुंतलेली आहे. शाहरुखही सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. सर्व गाणी तो त्याच्या हँडलने शेअर करतोय. आस्क मी (AskSRK) या हॅशटॅगने त्याने ट्विटरवर चाहत्यांना प्रश्न विचारला, त्यानंतर प्रश्नांचा पूर आला होता.
रोहित शर्माच्या आवडत्या कलाकारांच्या यादीत शाहरुख खानचे नाव देखील येते. रोहितने २०१८ मध्ये शाहरुखचे एक ट्विट रिट्विट केले आणि लिहिले की त्याचा बाजीगर चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत शीर्षस्थानी आहे, यात काही शंका नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"