Join us

रोहित शर्मासाठी शाहरुख खान बाझीगरच्या गाण्यावर धरणार ठेका

बाझीगर सिनेमातील ' ये काली काली आंखे...' या गाण्यावर डान्स करणार असल्याचे शाहरुखने सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 18:53 IST

Open in App
ठळक मुद्देआज बाझीगर या सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याने एक पोस्ट लिहीली.ही पोस्ट भारताचा तडफदार सलामीवीर रोहित शर्माला चांगलीच आवडली आणि त्याने आपली कमेंटही दिली.

नवी दिल्ली : आपल्या चाहत्यांवर बॉलीवूडचा किंग शाहरुख खान नेहमीच फिदा असतो. आज बाझीगर या सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याने एक पोस्ट लिहीली. ही पोस्ट भारताचा तडफदार सलामीवीर रोहित शर्माला चांगलीच आवडली आणि त्याने आपली कमेंटही दिली. या कमेंटवर शाहरुख चांगलाच खूष झाला. त्यानंतर शाहरुखने रोहितला एक वचन दिले. आगामी आयपीएलच्या कार्यक्रमात मी तुझ्यासाठी बाझीगर सिनेमातील ' ये काली काली आंखे...' या गाण्यावर डान्स करणार असल्याचे सांगितले आहे.

अशी झाली टि्वटरबाजी

टॅग्स :रोहित शर्माशाहरुख खानआयपीएल