Join us  

पाकिस्तानी खेळाडूला भारताविरुद्ध क्रिकेट मालिकेचे डोहाळे

माजी कर्णधार इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेची मागणी जोर धरू लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 10:21 AM

Open in App

नवी दिल्ली- माजी कर्णधार इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थात ही मागणी पाकिस्तानमधूनच होत आहे. खेळाडूंनाही भारताविरुद्ध मालिका व्हावी अशी इच्छा प्रकट झाली आहे. 

याबाबत अधिकृत हालचाली सुरू झाल्या नसल्या तरी चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. अशाच एका चाहत्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिकेबद्दल पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला विचारले. त्यावर आफ्रिदीनेही उभय देशांत मालिका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ ला अखेरची मालिका झाली होती. २ ट्वेंटी -२० आणि ३ वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. ट्वेंटी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत सुटली होती, तर वन डे मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला होता.  पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांशी दोन वेळा भिडतील. 

टॅग्स :भारतपाकिस्तानक्रिकेटक्रीडा