पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) अजूनही फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहे. त्यामुळे जगातील अनेक फ्रँचायझी लीगमध्ये त्याच्यासाठी चुरस रंगलेली पाहायला मिळतेच. आता तो अबुधाबी येथे होणाऱ्या T10 लीगसाठी सज्ज आहे, परंतु त्याला एका छोट्याश्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.
''अबुधाबीत होणाऱ्या या T10 लीगने जगभरातील अनेक क्रिकेटपटूंना आकर्षित केले आहे. या लीगचे चौथे सत्राची घोषणा करताना आनंद होत आहे. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक ही मोठी नावं यंदा खेळणार आहेत,'' असे या लीगचे चेअरमन शाजी उल-मुल्क यांनी सांगितले.
मराठा अरेबियन्सन आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यात २८ जानेवारीला सलामीचा सामना होणार आहे. आफ्रिदी प्रतिनिधित्व करणाऱ्या कलंदर्स संघाचा पहिला सामना २९ जानेवारीला पुणे डेव्हिल्ससोबत होणार आहे.