Join us

Shaheen Afridi: शाहीन आफ्रीदीने जगाला केलं चकीत, वर्ल्ड रेकॉर्डवर कोरलं नाव!

WI vs PAK: शाहीन आफ्रिदीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 20:26 IST

Open in App

शाहीन आफ्रिदीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. या सामन्यात शाहीन आफ्रीदीने चार विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६५ सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो गोलंदाज ठरला. या कामगिरीसह त्याने अफगाणिस्तानचा ऑलराउंडर रशीद खानचा विश्व विक्रम मोडला.  रशीदने ६५ एकदिवसीय सामन्यांत १२८ विकेट्स घेतल्या. तर, शाहीन आफ्रीदीने इतक्यात सामन्यात १३१ विकेट्स घेतल्या आहेत. 

याशिवाय, शाहीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (सर्व फॉरमॅटमध्ये) ३५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. शाहीन हा पाकिस्तानचा ११वा गोलंदाज आहे, ज्याने असे केले आहे. पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ९१६ विकेट्स घेतल्या आहेत.

६५ एकदिवसीय सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स१) शाहीन शाह आफ्रिदी- १३१ विकेट्स२) रशीद खान- १२८ विकेट्स३) मिचेल स्टार्क- १२६ विकेट्स४) सकलेन मुश्ताक- १२२ विकेट्स५) शेन बाँड- १२२ विकेट्स

पाकिस्तानचा दणदणीत विजयवेस्ट इंडिजने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकांत २८० धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून एविन लुईसने सर्वाधिक धावा केल्या. एविन लुईसने ६० धावांची खेळी केली. याशिवाय, शाई होपने ५५ आणि रोस्टन चेसने ५३ धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीनने ८ षटकांत ५१ धावांत ४ विकेट्स घेतल्या आहेत. तर, नसीम शाहने तीन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या संघाने हा सामना ५ विकेट्सने जिंकला. पाकिस्तानकडून कर्णधार मोहम्मद रिझवानने ५३ धावा आणि हसन नवाजने ५४ चेंडूत ६३ धावा करत संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या बाबर आझमने सामन्यात ६४ चेंडूत ४७ धावा केल्या, ज्यामध्ये एक षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. नवाजला त्याच्या वादळी खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.