शाहिद आफ्रिदीच्या जावयावर भडकला शोएब अख्तर; म्हणाला, आधी विकेट घे अन् मग फ्लाईंग किस देत बस!

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या वन डे सामन्यात सपाटून मार खावा लागला अन् तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी विजयी आघाडी घेतली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 01:17 PM2021-07-12T13:17:18+5:302021-07-12T13:29:00+5:30

whatsapp join usJoin us
Shaheen Afridi Likes Blowing Flying Kisses More Than Taking Wickets: Shoaib Akhtar Slams The Pacer’s Performance | शाहिद आफ्रिदीच्या जावयावर भडकला शोएब अख्तर; म्हणाला, आधी विकेट घे अन् मग फ्लाईंग किस देत बस!

शाहिद आफ्रिदीच्या जावयावर भडकला शोएब अख्तर; म्हणाला, आधी विकेट घे अन् मग फ्लाईंग किस देत बस!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या वन डे सामन्यात सपाटून मार खावा लागला अन् तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानी खेळाडूंच्या कामगिरीवर माजी खेळाडू सडकून टीका करत आहे. माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं शाहिद आफ्रिदीचा होणारा जावई शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) याच्यावर हल्लाबोल केला. 

 I̶t̶'̶s̶ ̶c̶o̶m̶i̶n̶g̶ ̶H̶O̶M̶E̶, It's gone to Rome!; इटलीत जल्लोष, तर इंग्लंडमध्ये सन्नाटा; साऱ्यांनाच पडला कोरोनाचा विसर!

पाकिस्तानी संघाला पहिल्या वन डे सामन्यात १४१ धावा करता आल्या आणि इंग्लंडनं ९ विकेट्सन हा सामना जिंकला. लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात हसन अलीनं पाच विकेट्स घेतल्या, परंतु फिलीप सॉल्ट ( ६०) व जेम्स व्हिंस ( ५६) यांच्या ९७ धावांच्या भागीदारीनं इंग्लंडनं २४७ धावांपर्यंत मजल मारली. पण, पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४१ षटकांत १९५ धावांत माघारी परतला. सौद शकीलनं अर्धशतक झळकावलं. इंग्लंडनं ५२ धावांनी हा सामना जिंकला.

'तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलताय, त्यानं तर अजून IPLही जिंकलेलं नाही'; विराट कोहलीच्या नेतृत्वावर सुरेश रैनाचं मोठं विधान

पाकिस्तानच्या आणखी एका पराभवानंतर अख्तर चांगलाच भडकला अन् यावेळी त्यानं शाहीन आफ्रिदीला सुनावलं ''विकेट घेण्यापेक्षा शाहीन फ्लाईंग किसच जास्त देतोय. किमान पाच विकेट्स तरी घे किंवा फलंदाजीत तरी योगदान दे, मग त्यानंतर फ्लाईंग किस अन् मिठ्या मार... एक विकेट घेतल्यानंतर असं करण्याचा काय अर्थ आहे. संघाच्या पराभवामागची कारण देऊ नका. मालिकेला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधी इंग्लंडनं हा संघ घोषित केला आणि तुम्ही ३० दिवस एकत्र राहुनही अशी कामगिरी करताय... इंग्लंडच्या अकादमीतील संघाकडून तुम्ही हरलात,''असे अख्तर म्हणाला. 

Web Title: Shaheen Afridi Likes Blowing Flying Kisses More Than Taking Wickets: Shoaib Akhtar Slams The Pacer’s Performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.