IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध धमाका! लेडी सेहवागला झाला मोठा फायदा; दीप्ती घाट्यात

टी-२० मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडत धमाकेदार खेळीसह तिने पुन्हा एकदा आपल्या भात्यातील धमक दाखवून दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:10 IST2025-07-15T19:04:10+5:302025-07-15T19:10:48+5:30

whatsapp join usJoin us
Shafali Verma Re Enters Top 10 In ICC Womens T20I Rankings Deepti Sharma Suffers loss | IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध धमाका! लेडी सेहवागला झाला मोठा फायदा; दीप्ती घाट्यात

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध धमाका! लेडी सेहवागला झाला मोठा फायदा; दीप्ती घाट्यात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय नोंदवला. पहिल्यांदा इंग्लंडच्या मैदानात बाजी मारण्यासाठी लेडी सेहवाग अर्थात शेफाली वर्मा हिने मोलाची भूमिका बजावली. टी-२० मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडत धमाकेदार खेळीसह तिने पुन्हा एकदा आपल्या भात्यातील धमक दाखवून दिली.  या कामगिरीचा आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत तिला फायदा झाला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शेफाली वर्माची मुसंडी, पुन्हा टॉप १० मध्ये झाली एन्ट्री

शेफाली वर्मानं इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत १५८.५६ च्या स्ट्राइक रेटसह १७६ धावा केल्या होत्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत ती दुसऱ्या स्थानावर राहिली. या कामगिरीच्या जोरावर टी-२० रँकिंमध्ये तिने चार स्थानांनी उंच उडी मारत नवव्या स्थानावर पोहचली आहे.  इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात शेफाली वर्मानं ४१ चेंडूत ७५ धावांची खेळी केली होती. 

रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)

ICC च्या महिला टी-२० क्रमवारीत सलामवीर बॅटर स्मृतीचाही जलवा कायम

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारताची उपकर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना हिने सर्वाधिक २२१ धावा केल्या. या कामगिरीसह ती ICC महिला टी-२० क्रमवारीतील बॅटर्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन बॅटर बेथ मून अव्वल स्थानावर विराजमान असून वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज दुसऱ्या स्थानावर दिसते. बॅटर्सच्या यादीत स्मृती आणि शेफाली या दोन सलामीच्या बॅटर्सशिवाय अन्य कोणत्याही भारतीय महिला खेळाडूचे नाव दिसत नाही.

अरुंधती गोलंदाजीसह ऑलराउंडरच्या क्रमवारीतही फायद्यात, दीप्ती मात्र घाट्यात

गोलंदाजीत अरुंधती रेड्डी ६ विकेट्सच्या जोरावर रँकिंगमध्ये चार स्थानांनी सुधारणा करत ३९ व्या क्रमांकावर पोहचली आहे. ऑल राउंडरच्या यादीत अरुंधती २६ स्थानांच्या सुधारणेसह ८० व्या स्थानावर आली आहे. दीप्ती शर्माला मात्र नव्या ICC रँकिंगमध्ये घाटा झाल्याचे दिसून येते. गोलंदाजीतील क्रमवारीत तिची दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालीये. 
 

Web Title: Shafali Verma Re Enters Top 10 In ICC Womens T20I Rankings Deepti Sharma Suffers loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.