Join us  

Shafali Verma Women's U19 WC: शेफाली वर्मा अन् MS Dhoni मध्ये 'स्पेशल' कनेक्शन; जुळून आला अनोखा योगायोग

भारतीय महिला संघाने जिंकला १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 1:33 PM

Open in App

Shafali Verma MS Dhoni special connection: टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले. रविवारी (२९ जानेवारी) पॉचेफस्ट्रूम येथील सेनवेस पार्क येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. अंतिम सामना जिंकण्यासोबतच शेफाली वर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. अंडर-19 महिला T20 विश्वचषक यंदा प्रथमच खेळला गेला. शेफाली वर्मा ही स्पर्धा जिंकणारी पहिली कर्णधार ठरली.

शेफालीने धोनीसारखा चमत्कार केला!

शेफाली वर्माने आपल्या नेतृत्वाखाली एमएस धोनीने जवळपास 16 वर्षांपूर्वी केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. विशेष म्हणजे 2007 चा पुरुष T20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला होता. त्यात एमएस धोनीने आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. आणि यावेळीही दक्षिण आफ्रिकेत पहिला महिला अंडर-19 T20 विश्वचषकही आयोजित करण्यात आला होता. योगायोगाने यातही भारताचा विजय झाला.

ICC पुरुषांचा T20 विश्वचषक पहिल्यांदा 2007 मध्ये खेळला गेला. त्यावेळी, टी-२० फॉर्मेटमध्ये विश्वचषक आयोजित करण्याची ती पहिलीच वेळ होती. त्याचप्रमाणे, यावेळी आयसीसीने महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती आयोजित केली होती. म्हणजेच 19 वर्षांखालील महिला T20 आणि पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद भारतीय संघाला पटकावण्यात यश आले. याआधी फक्त पुरुष क्रिकेटमध्ये अंडर-19 विश्वचषक होता आणि तोही वनडे फॉरमॅटमध्ये. महिला क्रिकेटमध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

शेफाली वर्मा प्रथमच आयसीसी स्पर्धेत कर्णधार होती आणि तिने पहिल्याच प्रयत्नात टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. त्याचप्रमाणे, एमएस धोनीने 2007 टी-20 विश्वचषकाद्वारे प्रथमच आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आणि संघाला चॅम्पियन बनवले. धोनीच्या संघातही युवा खेळाडूंचा भरणा होता. तर शेफालीच्या संघातील सर्व खेळाडू नवे होते. 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारताने फक्त एकच सामना गमावला होता. या अंडर-19 T20 विश्वचषकातही भारताला केवळ ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना गमवावा लागला.

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनल
Open in App