ठळक मुद्देबीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने आपेल शोषण केल्याचा आरोप केला होता. हा आरोप बीसीसीआयने फारसा गंभीरपणे घेतला नव्हता.त्यानंतर मीटू मोहिम सुरु झाली आणि या महिलेने या मोहिमेअंतर्गत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा पर्दापाश केला.
मुंबई : काही दिवसांपूर्वी एका महिलेने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरु असून काही अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत. हा अहवाल बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील विनोद राय यांना सादर होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे समजत आहे.
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने आपेल शोषण केल्याचा आरोप केला होता. हा आरोप बीसीसीआयने फारसा गंभीरपणे घेतला नव्हता. पण त्यानंतर मीटू मोहिम सुरु झाली आणि या महिलेने या मोहिमेअंतर्गत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा पर्दापाश केला. त्यानंतर बीसीसीआयने जोहरी यांच्यावर कारवाई केली.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील डायला एडल्जी, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि स्पॉट फिक्संग प्रकरणातील याचिकाकर्ते आदित्य वर्मा या तिघांची एक चौकशीय समिती गठन करण्यात आली होती. या समितीपुढे विनोद राय आणि अनिरुद्ध वर्मा यांनी जबाब नोंदवला आहे. या चौकशी समितीचा अहवाल 15 नोव्हेंबरला बीसीसीआयपुढे सादर करण्यात येणार आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यावर जोहरी यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.