Harbhajan Singh Slams Lalit Modi Over Sreesanth Slap Gate Video Leak : इंडियन प्रीमियर लीग २००८ च्या पहिल्या हंगामात फिरकीपटू हरभजन सिंग याने श्रीसंत याला मारलेली 'थप्पड' पुन्हा चर्चेत आलीये. आयपीएल संस्थापक अन् तत्कालीन अध्यक्ष ललित मोदी याने पहिल्या वहिल्या हंगामात 'स्लॅम गेट' नावाने गाजलेल्या भांडणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीनं नाराजी व्यक्त केल्यावर आता हरभजन सिंग याने ललित मोदीवर राग काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही स्वार्थासाठी केलेली कृती
भज्जीने इंस्टंट बॉलिवूडशी संवाद साधताना जुन्या प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला आहे की, "१८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आणणे चुकीचे आहे. हे स्वार्थासाठी केलेले कृत्य आहे. लोक जी गोष्ट विसरलेत ती कटू आठवण पुन्हा ताजी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ही गोष्ट बाजूला ठेवून मी पुढे आलोय. पुन्हा पुन्हा ते प्रकरण उकरून काढणं हे त्रासदायक आहे." अशा आशयाच्या शब्दांत हरभजन सिंग याने ललित मोदींवर राग काढला आहे.
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
हरबजनवरी ११ सामन्यांची बंदी, अनेक वेळा त्याने माफीही मागितली, पण...
२००८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्याचा पंजाब किंग्ज) यांच्यातील सामन्यात हरभजन सिंग याने रागाच्या भरात श्रीसंतला कानाखाली लगावली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले. एवढेच नाही तर हे भांडण आयपीएलच्या सर्वात वादग्रस्त प्रकरणापैकी एक ठरले. या प्रकरणात हरभजन सिंगवर निलंबनाची कारवाई झाली होती. ११ सामने त्याला बाहेर बसवले. अनेकवेळा या प्रकरणात हरभजन सिंगने आपली चूक मान्य करत श्रीसंतची माफी मागितलीये. दोघेही हे प्रकरण विसरुन आपल्या आयुष्यात पुढे गेले असताना आता ललित मोदीनं ऑस्ट्रेलियन क्रिकेटर क्लार्कसोबत गप्पा गोष्टी करताना जुन्या प्रकरणातील व्हिडिओ शेअर करुन लक्षवेधून घेण्याचा प्रकार केला आहे.
तत्कालीन मॅच रेफ्रींसह हर्ष भोगले यांनीही मांडलंय मत
हरभजन सिंग आणि श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीशिवाय क्रीडा जगतातील अन्य मंडळींनीही व्हायरल व्हिडिओवर भाष्य केले आहे. माजी क्रिकेटर आणि हे प्रकरण घडलं त्यावेळी सामनाधिकारी असणारे फारुख इंजीनियर यांनीही यावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची गोपिनियेतवर भर दिला होता. हा व्हिडिओ कधी बाहेर येईल, याची कल्पनाही केली नव्हती, असे ते म्हणाले आहेत. क्रीडा समीक्षक हर्ष भोगले यांनी हा व्हिडिओ लपवण्यामागचं कारण सांगताना म्हणाले की, BCCI आणि IPL कडून खेळाडूंची छबी जपण्यासाठी व्हिडिओ सार्वजनिक करणं टाळलं होते. या कटू आठवणी उकरुन काढणं हे खेळाडू अन् त्याच्या कुटुंबियांसाठी त्रासदासकच आहे.