Join us

भारतीय क्रिकेट संघाची निवड आज, वेगवान गोलंदाज चर्चेचा विषय

पुढील महिन्यात प्रारंभ होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची निवड करताना निवड समितीच्या दुसरा यष्टिरक्षक, चौथ्या स्थानावरील फलंदाज आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज हे महत्त्वाचे मुद्दे असतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:29 IST

Open in App

नवी दिल्ली : पुढील महिन्यात प्रारंभ होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची निवड करताना निवड समितीच्या दुसरा यष्टिरक्षक, चौथ्या स्थानावरील फलंदाज आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज हे महत्त्वाचे मुद्दे असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीने संकेत दिले होते की, केवळ एका स्थानाची निवड शिल्लक असून कोअर टीम एक वर्षापूर्वीच जवळजवळ निश्चित झाली आहे.इंग्लंडमध्ये ३० मेपासून प्रारंभ होणाºया विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघातील सदस्य जवळजवळ निश्चित आहे, पण संघ संयोजनावर विचार होईल. दुसºया यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी युवा रिषभ पंत आणि अनुभवी दिनेश कार्तिक यांच्यात चुरस राहील. पंतने आतापर्यंत आयपीएलमध्ये २२२ धावा फटकावल्या आहेत तर दिनेश कार्तिकने ९३ धावा केल्या आहेत. पंतचे पारडे वरचढ वाटत आहे. कारण तो सलामीपासून ते सातव्या स्थानापर्यंत कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. यष्टिरक्षणामध्ये सुधारणा करण्यास वाव आहे, पण कार्तिकची गेल्या वर्षभरातील कामगिरी विशेष चांगली नाही. तिसरा सलामीवीर म्हणून लोकेश राहुल दावेदार आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३३५ धावा केल्या आहेत. तो तिसºया सलामीवीर फलंदाजाव्यतिरिक्त दुसरा यष्टिरक्षक म्हणूनही भूमिका बजावू शकतो. राहुलला संधी मिळाली तर चौथ्या क्रमांकावर अंबाती रायडूसाठी स्थान निर्माण होऊ शकते. नोव्हेंबर महिन्यापर्यंत रायुडू चौथ्या क्रमांकासाठी कोहली व रवी शास्त्री यांचा पहिला पर्याय होता, पण स्थानिक क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय व वेगवान गोलंदाजीविरुद्ध त्याचे कमकुवत तंत्र त्याच्या विरोधात गेले. संघ व्यवस्थापनाने विजय शंकरची निवड केली, तर रायुडूसाठी संघाची दारे बंद होतील.इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यावर चौथ्या अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची निवड करणेही सोपे नाही. उमेश यादवला सातत्य राखता आलेले नाही, तर डावखुरा खलील अहमदमध्ये परिपक्वता दिसली नाही.>संभाव्य संघनिवड निश्चित असलेले खेळाडू : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, विजय शंकर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा.१५ सदस्य (पर्याय)दुसरा यष्टिरक्षक : रिषभ पंत/दिनेश कार्तिक. चौथा क्रमांक : अंबाती रायुडू. चौथा वेगवान गोलंदाज : उमेश यादव/खलील अहमद/ ईशांत शर्मा / नवदीप सैनी.

टॅग्स :दिनेश कार्तिकविश्वचषक ट्वेन्टी-२०