अंधांच्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या निवड शिबिराला पुण्यात सुरुवात

या शिबिरात भाग घेण्यारा ४० खेळाडूंपैकी १७ खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये करतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 07:54 PM2018-10-31T19:54:26+5:302018-10-31T19:55:01+5:30

whatsapp join usJoin us
The selection camp of blind Maharashtra Cricket team started in Pune | अंधांच्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या निवड शिबिराला पुण्यात सुरुवात

अंधांच्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या निवड शिबिराला पुण्यात सुरुवात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) ने प्रशिक्षणासह अंधांच्या महाराष्ट्र क्रिकेट टीमच्या निवडीचे शिबीर "३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात  पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे आयोजित केले आहे. याशिबीरात संपूर्ण महाराष्ट्रातून ४० पूर्णपणे आणि काही अंशतः अंध खेळाडू सहभाग घेणार आहेत. हे सगळे खेळाडू विभाग पातळीवरील सामने आणि राज्य पातळीवरील सामन्यांमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधार वर  निवडण्यात आले आहेत. ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबईत झालेल्या राज्यपातळीवरील सामन्यांमध्ये भाग घेतलेल्या १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता यातून ४० उत्तम खेळाडू या शिबिरात निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्र संघाची निवड डब्ल्यूबीसीसी (वर्ल्ड अंध क्रिकेट परिषद) आणि सीएबीआय (क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया) याच्या नियमांतर्गत होणार आहे. 

या शिबिराचे उद्धाटन प्रसंगी श्री. इम्तियाज दफेदार उपाध्यक्ष, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि श्री. सुनील बाळ सचिव पीडीसीए उपस्थित पार पडले. या निम्मित बोलतना श्री. इम्तियाज दफेदार म्हणाले क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष खेळाडूंसाठी फारच चांगले उपक्रम राबवीत आहे. सर्व खेळाडूना शुभेच्या देताना पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सदैव तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहील असे सांगितले.

या शिबिराचा मूळ उद्देश खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी योग्य दिशा आणि सूचना मिळणे तसेच एखाद्या खेळाडूकडून सांघिक लक्ष गाठण्यास आणि योग्य ध्येयपूर्तीकडे वाटचालीस सहकार्य करणे हा आहे. प्रशिक्षणामुळे खेळाडूना आत्मविश्वास मिळतो आणि त्यांना चांगले खेळण्यास प्रेरणा मिळते. येथे एका चांगल्या क्रिकेट खेळाडूसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कौशल्यांना सराव केला जाणार आहे. या शिबिरात फलंदाजी,  गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही मूळ गुणांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

Web Title: The selection camp of blind Maharashtra Cricket team started in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.