Join us  

‘सेहवाग डाव्या हाताने फलंदाजी करीत असल्याचा भास झाला’

“ऋषभ पंत अतिशय़ उत्तम खेळाडू आहे. अनेक दिवसानंतर मी असा खेळाडू पाहिला. त्याच्यावर दडपणाचा कोणताही परिणाम होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 3:22 AM

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत शतकवीर यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने वेगवान जेम्स ॲन्डरसनच्या चेंडूवर ‘रिव्हर्स फ्लिक’चा फटका मारून अनेकांना चकित केले. जागतिक क्रिकेटमध्ये असा फटका मारणारे फलंदाज विरळच. या कामगिरीबद्दल पंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने ऋषभच्या खेळीचे कौतुक केले.पंतच्या खेळीची क्रिकेट विश्वाने दखल घेतली असून, पंत जेव्हा कधी फलंदाजी करतो तेव्हा आपण वीरेंद्र सेहवागलाच डाव्या हाताने खेळताना पाहत असल्याचा भास होत असल्याचे इंझमामने म्हटले आहे. कितीही दबाव असला तरी फरक पडत नाही, हा सेहवागचा गुणधर्म पंतमध्येही असल्याचे इंझमामने सांगितले.

“ऋषभ पंत अतिशय़ उत्तम खेळाडू आहे. अनेक दिवसानंतर मी असा खेळाडू पाहिला. त्याच्यावर दडपणाचा कोणताही परिणाम होत नाही. १४६ धावांवर सहा गडी बाद झाले असतानाही ज्या पद्धतीने तो सुरुवात करतो, तसे कुणीही करीत नाही. तो स्वत:चे शॉट खेळत असतो आणि यावेळी खेळपट्टी कशी आहे किंवा समोरच्या संघाने किती धावा केल्या आहेत, याचा त्याला फरक पडत नाही. फिरकी असो किंवा जलद गोलंदाज. दोघांविरोधात त्याची खेळी उत्तम आहे. त्याला खेळताना पाहून मी देखील आनंद लुटत होतो. जणू काही सेहवागलाच डाव्या हाताने खेळताना पाहत होतो’, असे इंझमाम म्हणाला.‘मी सेहवागसोबत खेळलो आहे आणि त्यालादेखील इतर गोष्टींचा फरक पडत नव्हता. जेव्हा तो फलंदाजी करायचा तेव्हा खेळपट्टी कशी आहे किंवा समोरची गोलंदाजी कोणत्या पद्धतीची आहे, याचा त्याला फरक पडत नव्हता. तो आपले शॉट खेळायचा. सेहवागनंतर मी पहिल्यांदाच असा खेळाडू पाहिला आहे .

इंझमाम उल हककडून ऋषभ पंतचे कौतुक

पंत फक्त भारतातच खेळतोय असे नाही. त्याने ऑस्ट्रेलियातही चांगली खेळी केली. ज्या पद्धतीने तो खेळतो ते जबरदस्त आहे. ज्या पद्धतीचा आत्मविश्वास त्याच्यात आहे, मी असा खेळाडू क्रिकेटमध्ये पाहिलेला नाही,’ असे मत इंझमामने व्यक्त केले.

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ