नवी दिल्ली : न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर सध्या खूप चर्चेत आहे. त्याने त्याचे आत्मचरित्र ‘ब्लॅक अँड व्हाईट’मधून आपल्या सोबत झालेल्या गैरव्यवहारांचा खुलासा केला. टेलर जेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाचा हिस्सा होता तेव्हा संघाचा तत्कालीन कर्णधार वीरेंद्र सेहवागने एका सामन्यात आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याने केला आहे. टेलरने लिहिले की, २०१२ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना , एका संध्याकाळी तो वीरेंद्र सेहवागसोबत जेवत होता. यादरम्यान, सेहवाग त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होता. दुसऱ्या दिवशी दिल्लीचा सामना होता. सेहवाग त्या आक्रमक फलंदाजी करता होता. दुसरीकडे सर्व विदेशी फलंदाज अडखळत होते. तेव्हा सेहवागने त्याला रागाने धक्काबुक्की केली. सेहवाग मला धक्का मारून म्हणाला, ‘रॉस काल तू ज्या पद्धतीने जेवत होतास तशी फलंदाजी कर,’ असे टेलरने आरोप करताना म्हटले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘सेहवागने मला धक्काबुक्की केली होती’, रॉस टेलरचा आरोप
‘सेहवागने मला धक्काबुक्की केली होती’, रॉस टेलरचा आरोप
टेलर जेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाचा हिस्सा होता तेव्हा संघाचा तत्कालीन कर्णधार वीरेंद्र सेहवागने एका सामन्यात आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याने केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 05:30 IST