Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीच्या टी-शर्टमध्ये दिसायला नको ते दिसलं, फोटो झाला वायरल

सध्याच्या घडीला विराटचा सफेद रंगाचा टी-शर्ट घातलेला फोटो चांगलाच वायर होताना दिसत आहे. पण या टी-शर्टमध्ये नेमकं दडलंय तरी काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:20 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे एक सेलिब्रेटी कपल आहे. त्यामुळे त्यांचे सर्वात जास्त फोटो वायरल होताना दिसतात. विराट आणि अनुष्का या जोडीने आपले प्रेम कधीच लपवले नाही. काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपले प्रेम जगजाहीर केले. या दोघांचे फोटो वायरलही होतात आणि हे दोघे बऱ्याचदा ट्रोलही होताना दिसतात. पण सध्याच्या घडीला विराटचा सफेद रंगाचा टी-शर्ट घातलेला फोटो चांगलाच वायर होताना दिसत आहे. पण या टी-शर्टमध्ये नेमकं दडलंय तरी काय...

 भारतीय संघाने विंडीज मालिकेत ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-20 व कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातून मायदेशात परतलेल्या कोहलीनं बुधवारी सोशल मीडियावर अनुष्कासोबतचा 'HOT' फोटो शेअर केला. त्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला. 

विराटचा हा फोटो चांगलाच वायरल झाला होता. या फोटोतील विराटच्या टी-शर्टवर एक लाल रंगाचा दिलचा आकार आहे आणि त्याखाली अनुष्काचा A लिहिला आहे. विराटचा हा फोटो सर्वात जास्त वायरल झाला होता. विराटने या फोटोचे क्रेडीट अनुष्काला दिले होते. त्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोलही केले होते.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा