दुसरा टी-२० आज : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वचपा काढण्यास सज्ज

तीन महिन्यात भारताचा मर्यादित षटकांचा हा पहिलाच सामना होता. त्यात लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहलसारखे मॅचविनर फॉर्ममध्ये जाणवले नाहीत. इंग्लंडने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला खुजे ठरवले. एका पराभवामुळे भारतीय  संघावर टीका करणे योग्य नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:28+5:302021-03-14T06:50:53+5:30

whatsapp join usJoin us
Second T20 today: Indian team ready to play against England | दुसरा टी-२० आज : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वचपा काढण्यास सज्ज

दुसरा टी-२० आज : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वचपा काढण्यास सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : पहिल्या सामन्यात स्टार फलंदाज आणि मॅचविनर अपयशी ठरताच पराभवाचा धक्का सहन करणारा भारतीय संघ आज रविवारी येथे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-२०त वचपा काढण्यास सज्ज आहे. मात्र त्यासाठी फलंदाजीत सुधारणा करण्याचे अवघड आव्हान असेल. (Second T20 today: Indian team ready to play against England)

तीन महिन्यात भारताचा मर्यादित षटकांचा हा पहिलाच सामना होता. त्यात लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहलसारखे मॅचविनर फॉर्ममध्ये जाणवले नाहीत. इंग्लंडने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला खुजे ठरवले. एका पराभवामुळे भारतीय 
संघावर टीका करणे योग्य नाही. विराटचा संघ पराभवानंतर मुसंडी मारण्यात तरबेज मानला जातो. 

कोहलीने सामन्याआधी सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंविषयी विचार केला होता. याचा अर्थ त्याला ऋषभ पंत आणि हार्दिककडून मोठ्या अपेक्षा आहेत. हे दोघे बेजबाबदारपणे बाद झाले. श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता एकही फलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्यापुढे स्थिरावला नव्हता. दोघांना उसळी घेणाऱ्या चेंडूंचा वेध घेता आला नाही. या खेळपट्टीवर मनसोक्त फटकेबाजी करता येत नाही, अशी कोहलीने सामन्यानंतर कबुलीही दिली. श्रेयसचा अपवाद वगळता एकही फलंदाज उसळी घेणाऱ्या चेंडूंचा वेध घेऊ शकला नव्हता.

अंतिम एकादशमध्ये एक बदल अपेक्षित असून सूर्यकुमार यादवला स्थान मिळू शकेल. शिखर धवनने काल १२ चेंडूत केवळ चार धावा केल्या. रोहितला मात्र सलग सहा कसोटी सामने खेळल्यानंतर विश्रांती देण्यात आली. आघाडीच्या फळीत रोहितचे असणे अनिवार्य आहे. युजवेंद्रचे स्थान राहुल तेवतिया घेऊ शकतो. भारताच्या तुलनेत इयोन मोर्गनचा संघ मात्र तुल्यबळ वाटला.

उभय संघ यातून निवडणार
 भारत :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया, इशान किशन (राखीव यष्टिरक्षक).

इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाॅम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, क्रिस जोर्डन, मार्क वूड, सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.
 

Web Title: Second T20 today: Indian team ready to play against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.