Join us  

स्कॉटलंडने नोंदवला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील मोठा विजय; वर्ल्ड कपमध्ये मिळवला प्रवेश

स्कॉटलंड संघाने बुधवारी  ICC Men's T20 World Cup Qualifier स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 7:14 PM

Open in App

स्कॉटलंड संघाने बुधवारी  ICC Men's T20 World Cup Qualifier स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजय मिळवला. स्कॉटलंडच्या 6 बाद 198 धावांचा पाठलाग करताना यूएईचा संघ 18.3 षटकांत 108 धावांत माघारी परतला. त्यांनी 90 धावांनी सामना जिंकला आणि स्कॉटलंडचा हा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील दुसरा मोठा विजय ठरला. जॉर्ज मुन्सी आणि रिची बेरिंग्टन यांच्या फटकेबाजीनं स्कॉटलंडला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे तिकीट मिळवून दिले.

जॉर्ज मुन्सी आणि कर्णधार कायले कोएत्झर यांनी स्कॉटलंडला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावा जोडल्या. कोएत्झर 33 चेंडूंत 4 चौकारांसह 34 धावांत माघारी परतला. त्यानंतर आलेला मिचेल लिस्क ( 12) फार कमाल करू शकला नाही. पण, रिची बेरिंग्टनने दमदार खेळ केला. दरम्यान मुन्सीनं 43 चेंडूंत 2 चौकार व 5 षटकारांसह 65 धावा केल्या. बेरिंग्टनने 18 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 48 धावा चोपल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर स्कॉटलंडने 6 बाद 198 धावा केल्या. यूएईच्या रोहन मुस्तफाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात यूएईला 12 धावांत सलामीवीर गमवावे लागले. रमीझ शहजाद ( 34) आणि मुहम्मद उस्मान ( 20) हे वगळता अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. यूएईच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. स्कॉटलंडच्या साफयान शरीफ आणि मार्क वॅट यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. 

फिनिक्स भरारी; छोट्याश्या बेटावरील संघ खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप; देणार दिग्गजांना टक्करपापुआ न्यू गिनी, असं या संघाने ICC Men's T20 World Cup Qualifier स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात A गटात केनियावर थरारक विजय मिळवून 2020च्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. इम्मान्युएल रिंगेरा यानं गोलंदाजीत कमाल दाखवताना 18 धावांत पापुआ न्यू गिनीच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. त्याला लुकास ओलुच व कॉलिन ओबुया यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत उत्तम साथ दिली. त्यांच्या अचुक माऱ्यासमोर पापुआ न्यू गिनीचा संघ 19.3 षटकांत 118 धावांत माघारी परतला. नोर्मन वनुआने अखेरच्या षटकांत संमजसपणे खेळ केला. त्याच्या 48 चेंडूवरील 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं 54 धावा करत पापुआ न्यू गिनीला समाधानकारक पल्ला गाठून दिला.

केनियाला हे माफक आव्हानही पार करता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 73 धावांत गारद झाला. नोसैना पोकाना ( 3/21), अस्साद वाला ( 3/7), वनुआ ( 2/19) आणि डॅमिएन रावू ( 2/14) यांनी केनियाला धक्के दिले. केनियाला 18.4 षटकांत 73 धावा करता आल्या. या विजयासह पापुआ न्यू गिनीनं A गटात सर्वाधिक 10 गुणांची कमाई केली आणि अव्वल स्थान पटकावले. या कामगिरीसह पापुआ न्यू गिनीनं ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

जर्सी संघ आयर्लंडला पावलाB गटात जर्सी संघाने अखेरच्या साळखी सामन्यात ओमानचा पराभव करत आयर्लंडचा वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य फेरीचा मार्ग मोकळा केला. जर्सीच्या 7 बाद 141 धावांचा पाठलाग करताना ओमानला 9 बाद 127 धावा करता आल्या. त्यामुळे B गटात ओमान आणि आयर्लंड यांच्यात समसमान 8 गुण झाले, परंतु सर्वोत्तम नेट रन रेटच्या जोरावर आयर्लंडने मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळवला. आता ओमानला प्ले ऑफ मार्गे मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020टी-20 क्रिकेट