पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेला इंग्लंडचा क्रिकेटपटू अॅलेक्स हेल्स याच्या शरिरात कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. हेल्सला कोरोना झाला आहे की नाही याबाबद अजूनही ठोस अहवाल समोर आलेला नाही. हेल्सनं स्वतःला आयसोलेट केले आहे. जगभरात या व्हायरच्या कचाट्यात दोन लाखांहून अधिक लोकं आलेली आहेत आणि मृतांचा आकडा हा 9 हजाराच्या आसपास पोहोचला आहे. क्रीडाक्षेत्रालाही याची झळ लागलेली आहे. हेल्सचा वैद्यकीय अहवाल समोर येईल तेव्हा येईल, परंतु आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. टीम इंडियाविरुद्ध एक सामना खेळलेला खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे.
स्कॉटलंडचा माजीद हक याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेला हा पहिलाच व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. 37 वर्षीय माजीदनं सोशल मीडियावरून ही माहिती दिली. तो म्हणाला,''कोरोना व्हायरसचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यातून बरा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पैस्ली येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले आहे आणि त्यांच्याकडून योग्य ते उपचार केले जात आहेत. माझ्या तंदुरुस्तीसाठी मॅसेज करणाऱ्यांचे आभार. अल्लाहच्या कृपेनं हा वाघ लवकरच बरा होईल.''
माजीद हकने 54 वन डे आणि 21 ट्वेंटी-20 सामन्यांत स्कॉटलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2007 मध्ये त्यानं भारताविरुद्ध एकमेव वन डे सामना खेळला होता. 2015च्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत तो खेळला होता. स्कॉटलंडकडून सर्वाधिक 60 विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. लंडनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी शुक्रवारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करताना लॉकडाऊनची घोषणा केली. लंडनमध्ये 3000 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 160 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकाही रद्द करण्यात आली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
टोकियो ऑलिम्पिक स्थगित करणे अतिघाईचे ठरेल, थॉमस बाक
coronavirus : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व झाले ठप्प