Schedule for TATA IPL 2025 Playoffs announced : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील साखळी फेरीतील लढती शेवटच्या टप्प्यात असताना मंगळवारी बीसीसीआयने टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ प्लेऑफच्या लढती कुठं खेळवण्यात येणार त्यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत आयपीएल स्पर्धा आठवड्याभरांसाठी स्थगित करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकात प्लेऑफ्सच्या सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. पण हे सामने कुठं खेळवण्यात येणार ते निश्चित नव्हते. पण आता प्लेऑफ्सच्या चार लढती कोणत्या मैदानात खेळवण्यात येणार ते स्पष्ट झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्लेऑफ्सच्या दोन लढतीसाठी हे ठिकाण झाले निश्चित
न्यू चंदीगडमधील न्यू पीसीए स्टेडियमवर गुरुवारी २९ मे रोजी क्वालिफायर १ ची लढत खेळवण्यात येणार आहे. गुणतालिकेत आघाडीवर असणारे दोन संघ या लढतीत एकमेकांसमोर असतील. यातील विजेता संघ थेट फायनल गाठेल. शुक्रवारी ३० मे रोजी याच मैदानात एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. ही लढत गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघामध्ये होईल. यातील पराभूत संघ स्पर्धेतून बाद होईल. विजेता संघ आणि क्वालिफायर १ मधील पराभूत संघ क्वालिफायर २ च्या लढतीसाठी अहमदाबादला रवाना होतील.
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार फायनल
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम फायनलसह क्वालिफायर २ ची लढत खेळवण्यात येणार आहे. रविवारी १ जूनला पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेता संघ यांच्यातल क्वालिफायर २ ची लढत अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात येईल. यातील विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहचलेल्या संघासोबत याच मैदानात ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. यंदाच्या हंगामातील फायनल सामना ३ जूनला नियोजित आहे.
IPL 2025: मैदानावर भिडणं पडलं महागात; LSG च्या दिग्वेश राठीवर IPL प्रशासनाची कठोर कारवाई
साखळी फेरीतील एका सामन्याचे ठिकाणही बदलले
याशिवाय साखळी फेरीतील एका सामन्याचे ठिकाणही बदलण्यात आले आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील ६५ वा सामना सुधारित वेळापत्रकानुसार बंगळुरुच्या मैदानात नियोजित होता. पण खराब हवामानामुळे हा सामना आता लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
Web Title: Schedule for TATA IPL 2025 Playoffs announced Ahmedabads Narendra Modi Stadium Host Qualifier 2 With Grand Final And Qualifier 1 And Eliminator At New PCA Stadium in New Chandigarh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.